पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या सर्व कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:35 AM2019-08-17T11:35:18+5:302019-08-17T11:38:52+5:30

महापुरामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसाईक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरील व्यावसाईकांची संख्या मोठी आहे. कर्ज काढून सुुरु केलेला व्यवसायच पाण्यात गेल्याने हप्ते फेडणे व व्याज भरणे शक्य नाही. त्यामुळे व्यापारी व्यावसाईकांच्या सर्व तऱ्हेच्या कर्जावरील व्याज ५ आॅगस्टपासून सहा महिन्यांसाठी बॅँकांनी घेऊ नयेत. असे आदेश त्यांना द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना व व्यापाऱ्यांच्या व्यापक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

Interest on all loans from flood affected traders should not be charged for six months | पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या सर्व कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी घेऊ नये

पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या सर्व कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी घेऊ नये

Next
ठळक मुद्देपूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या सर्व कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी घेऊ नये जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : शिवसेनेसह व्यापारी, व्यावसाईकांनी दिले निवेदन

कोल्हापूर : महापुरामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसाईक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरील व्यावसाईकांची संख्या मोठी आहे. कर्ज काढून सुुरु केलेला व्यवसायच पाण्यात गेल्याने हप्ते फेडणे व व्याज भरणे शक्य नाही. त्यामुळे व्यापारी व्यावसाईकांच्या सर्व तऱ्हेच्या कर्जावरील व्याज ५ आॅगस्टपासून सहा महिन्यांसाठी बॅँकांनी घेऊ नयेत. असे आदेश त्यांना द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना व व्यापाऱ्यांच्या व्यापक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर करुन सविस्तर चर्चा केली. या पुरामुळे व्यापारी, व्यावसाईक पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. त्यांना उभे राहण्यासाठी शासनपातळीवर मदत होणे गरजेची आहे, असे पवार यांनी सांगितले.

निवेदनातील प्रमुख मागण्या अशा, सहा महिन्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी व्याज आकारणी करुन ती स्वतंत्र लिहून ठेवावी, परंतु व्याजावर व्याज, दंडव्याज आकारले जाऊ नये, मुदती कर्जात कर्जदारांना विनंतीनुसार कर्जमुक्त, कर्जहप्ता यांची फेररचना करुन घ्यावी, राष्ट्रीय, राज्य आपदा राहत कोष, शासन आदीकडून मिळणारी अंतिम मदत किंवा विमा परतावा जो कर्ज खात्यास परस्पर जमा होईल तो बॅँकेने कर्जास जमा करुन घेऊ नये, बॅँकांनी पूरग्रस्त कर्जदारांच्या बाबतीत कर्ज कॅश क्रेडीट स्वरुपाचे असल्यास ५ आॅगस्ट २०१९ रोजी कर्जमर्यादा होती तीच किमान पुढील १२ महिने विना बदल वापरण्याची जागा मिळावी.

कर्जदाराने बॅँकेस तारण दिलेल्या मालाची स्थावर, जंगम मालमत्तेची मासिक बाजारभावाने होणारी किंमत यावर त्याची उचलीची मर्यादा ठरते, पुरामुळे तारण नाहीसे झाले असेल किंवा त्याचे बाजारमुल्य घटले असेल, त्यामुळे कर्जदाराची किमान मंजूर मर्यादा वापरण्याची परवानगी त्याला मिळावी.

यावेळी नगरसेवक राहुल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दिलीप शेटे,अमर समर्थ, संजय शेटे, गिरिष साटम, शशिकांत बिडकर, शैलेश पुणेकर, कमलाकर जगदाळे, रणजीत आयरेकर, हर्षल सुर्वे, मनजित माने, कपिल डोईफोडे, शिवाजी पाटील, प्रवीण पालव, राजू जाधव, अभिजीत बुकशेठ आदी उपस्थित होते.

पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शशिकांत बिडकर, सुजित चव्हाण, दिलीप शेटे, शिवाजी पाटील, अमर समर्थ, संजय शेटे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Interest on all loans from flood affected traders should not be charged for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.