‘वारणा’च्या दूध उत्पादकांना बिनव्याजी कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:59+5:302021-09-06T04:27:59+5:30

ग्राम विकासमंत्री व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची विजयसिंह जाधव यांनी भेट घेऊन गोकूळ प्रमाणेच वारणेच्या ...

Interest free loan to milk producers of 'Warna' | ‘वारणा’च्या दूध उत्पादकांना बिनव्याजी कर्ज

‘वारणा’च्या दूध उत्पादकांना बिनव्याजी कर्ज

Next

ग्राम विकासमंत्री व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची विजयसिंह जाधव यांनी भेट घेऊन गोकूळ प्रमाणेच वारणेच्या दूध उत्पादकांना बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी केली होती.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने गोकूळ दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे याबद्दल सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने विजयसिंह जाधव यानी बँकेचे आभार मानले होते.

वारणा सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर जिल्ह्यातच आहे. या दूध संघाचेही जिल्हा कार्यक्षेत्र आहे. जिल्हा बँकेने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणारे बिनव्याजी कर्ज वारणा दूध संघाच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही दिले जावे, अशी आग्रहाची मागणी विजयसिंह जाधव यांनी मंत्री मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात केली होती ती मागणी मंजूर करून जिल्हा बँकेच्या प्रशासनाने प्रस्ताव सादर करावेत याबाबत वारणा दूध संघाला तसेच विजयसिंह जाधव यांना लेखी पत्राद्वारे कळवले सून लवकरच केडीसीसी बँक आणि वारणा दूध संघाच्या अधिकाऱ्यांची या संदर्भात बैठक घेतली जाणार आहे.

Web Title: Interest free loan to milk producers of 'Warna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.