‘बिद्री’च्या कर्मचाऱ्यांना ९०० रुपये अंतरिम पगारवाढ

By admin | Published: February 5, 2016 12:43 AM2016-02-05T00:43:35+5:302016-02-05T00:51:40+5:30

अरुण काकडे यांची माहिती

Intermediate salary increase of '9 00 per Bidri employees | ‘बिद्री’च्या कर्मचाऱ्यांना ९०० रुपये अंतरिम पगारवाढ

‘बिद्री’च्या कर्मचाऱ्यांना ९०० रुपये अंतरिम पगारवाढ

Next

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना द्यावयाची रुपये ९०० ची अंतरिम पगारवाढ १ जानेवारी २०१६पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अरुण काकडे यांनी दिली.
जानेवारी २०१६ पासून साखर कामगारांच्या पगारामध्ये रुपये ९००ची अंतरिम वाढ देण्याचा निर्णय झाला आहे. अंतरिम वाढीबाबत राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई यांनी १९ जानेवारी २०१६ रोजी कारखान्यास पत्र पाठवून वेतन मंडळाच्या कक्षेत येणाऱ्या कायम व हंगामी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ देण्याबाबत कळविले आहे. अंतरिम वाढीबाबत कामगार नेते आर. वाय. पाटील, छत्रपती शाहू साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय मोरबाळे, भीमराव किल्लेदार, शिवाजी केसरकर, प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अरुण काकडे, सदस्य ए. एम. ससाणे, प्रदीप मालगावे, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई, यांच्या संयुक्त बैठकीत झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Intermediate salary increase of '9 00 per Bidri employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.