डीकेटीईमध्ये इनोव्हेशन इन टेक्स्टाईलवर इंटरनॅशनल कॉन्फरन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:36+5:302021-09-02T04:51:36+5:30

इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमार्फत ‘इनोव्हेशन इन टेक्स्टाईल : प्रॉडक्टस् ॲण्ड प्रोसेस’ या विषयावर ऑनलाईन इंटरनॅशनल कॉन्फरन्सचे ...

International Conference on Innovation in Textiles at DKTE | डीकेटीईमध्ये इनोव्हेशन इन टेक्स्टाईलवर इंटरनॅशनल कॉन्फरन्स

डीकेटीईमध्ये इनोव्हेशन इन टेक्स्टाईलवर इंटरनॅशनल कॉन्फरन्स

Next

इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमार्फत ‘इनोव्हेशन इन टेक्स्टाईल : प्रॉडक्टस् ॲण्ड प्रोसेस’ या विषयावर ऑनलाईन इंटरनॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन केले आहे. कॉन्फरन्स २ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. यामध्ये जगभरातील तज्ज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत.

टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये सुरू असलेले नावीन्यपूर्ण संशोधन, सस्टेनेबल टेक्स्टाईलसाठीच्या नवीन संकल्पना, मेडिकल टेक्स्टाईलमध्ये होत असलेले बदल या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन यातील अडचणी व उपाय यावर चर्चा होणार आहे. कॉन्फरन्समध्ये डॉ. आर. एस. रंगास्वामी (दिल्ली), प्रा. डॉ. राजेश मिश्रा (बेंगलोर), प्रा. डॉ. नायको बेरेनइट (जर्मनी), प्रा. डॉ. ए. के. पात्रा (कानपूर) हे तज्ज्ञ सादरीकरणाच्या पहिल्यादिवशी, तर ३ सप्टेंबरला प्रा. डॉ. शेषाद्री रामकुमार (अमेरिका), डॉ. अयुब नबी खान (बांगलादेश), प्रा. डॉ. मानसकुमार (हाँगकाँग), विनय करूळकर (जर्मनी), प्रा. डॉ. प्रतीक गोस्वामी (इंग्लंड) यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. तरी या कॉन्फरन्सचा शहर व परिसरातील टेक्स्टाईल तज्ज्ञांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी केले आहे.

Web Title: International Conference on Innovation in Textiles at DKTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.