शिक्षणाची आस’ लघुपट आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:09 AM2017-12-13T01:09:04+5:302017-12-13T01:10:03+5:30
शिरोली : वडील रिक्षाचालक...आई गृहिणी... घरची परिस्थिती बेताचीच...पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तब्बल ८० हजार रुपये खर्च करून शिरोलीच्या गणेश खोचीकर या युवकाने
सतीश पाटील ।
शिरोली : वडील रिक्षाचालक...आई गृहिणी... घरची परिस्थिती बेताचीच...पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तब्बल ८० हजार रुपये खर्च करून शिरोलीच्या गणेश खोचीकर या युवकाने ‘शिक्षणाची आस’ ही शॉर्ट फिल्म तयार केली. या शॉर्ट फिल्मने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होत मोठी झेप घतली आहे. १४ डिसेंबरपासून कोल्हापुरात होणाºया ‘किफ’ या सहाव्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलसाठी या फिल्मची निवड झाली आहे.
गणेश खोचीकर हा शिरोली
(ता. हातकणंगले) येथील २१ वर्षांचा तरुण आहे. तो कोल्हापूर येथील राजारामपुरीतील देवल क्लब तथास्तु फोरम या ठिकाणी फिल्म अॅन्ड थियटर पदवी शिक्षण घेत आहे.
गणेशला लहानपणापासूनच चित्रपटाची आवड होती. बारावीनंतर गणेशने फिल्म इंडस्ट्रीजमधील फिल्म अॅन्ड थियटरमधील पदवी शिक्षण घेण्याचे ठरवले सध्या तो शिक्षण घेत आहे. दरम्यान त्याने ‘शिक्षणाची आस’ हा लघुपट बनवला आहे.
अतिशय कमी वयात शिरोलीतील गणेशने फिल्म इंडस्ट्रीजमध्ये मोठी झेप घेऊन शिरोलीचं नाव मोठं केले आहे. या लघुपटात प्रमुख भूमिकेत मिथिलेश कैंगारे, यशवंत चौगुले, मयूरी केसरकर, प्रतीक्षा सरवदे, रितेश जाधव हे आहेत.या लघुपटाचे निर्माते अभिजित कोळी आणि विशाल खोचीकर आहेत. तर छायाचित्रण प्रवीण जाधव, तसेच शिवानंद पुय्यम, श्रीधर जाधव, नवनाथ बंडगर, समर्थ भिलवडीकर यांचे सहकार्य लाभले.
आमच्या दृष्टीने लघुपट चांगला झाला आहे. याला फिल्म फेस्टिव्हलमध्ये निश्चितच मानांकन मिळेल, अशी आशा आहे. यासाठी ८० हजार रुपये खर्च झाला आहे. -अभिजित कोळी,
विशाल खोचीकर, निर्माते
शिक्षणाची आस हा वीस मिनिटांचा लघुपट बनविला आहे. माझ्या लघुपटाला निश्चितच मानांकन मिळेल. मी भालजी पेंढारकर यांना गुरू मानतो.
- गणेश खोचीकर, दिग्दर्शक