कोल्हापूरकरांना आज सायंकाळी पहायला मिळणार आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 03:38 PM2018-05-21T15:38:35+5:302018-05-21T15:38:35+5:30

खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांसाठी खूषखबर आहे. विशेषत: कोल्हापूर परिसरातील खगोलप्रेमींना अवकाशात मानवनिर्मित अवकाशीय वस्तू म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याची सुवर्णसंधी आज सायंकाळी मिळणार आहे.

International holiday station will be celebrated by Kolhapur | कोल्हापूरकरांना आज सायंकाळी पहायला मिळणार आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

कोल्हापूरकरांना आज सायंकाळी पहायला मिळणार आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

Next
ठळक मुद्देकोल्हापूरकरांना आज सायंकाळी पहायला मिळणार आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकजगभरातील सोळा देशांचा प्रकल्प, युरोपियन देशांचा प्रत्यक्ष सहभाग

कोल्हापूर : खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांसाठी खूषखबर आहे. विशेषत: कोल्हापूर परिसरातील खगोलप्रेमींना अवकाशात मानवनिर्मित अवकाशीय वस्तू म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याची सुवर्णसंधी आज सायंकाळी मिळणार आहे.


कोल्हापूरकरांना सायंकाळी पाहता येईल स्थानक

आज सायंकाळी असाच योग येईल. सायंकाळी साधारण ७.२५ वा. पासून ७ ३५ वा. पर्यंत हे स्थानक आपण पाहू शकतो. ७.२५ वा. हे स्थानक दक्षिण-पश्चिम दिशेतून वर येताना दिसेल. सिंह राशीतला मघा तारा आणि कन्या राशीतला चित्रा तारा यांच्या मध्ये हे स्थानक ७.३० वाजता दिसणार आहे आणि ते शोधायलाही सोपे जाणार आहे. हे अवकाश स्थानक बरोबर सहा मिनिटे दिसणार असून कोल्हापूर परिसरातील खगोलप्रेमींना ते साध्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे.



हे अवकाश स्थानक पृथ्वी भोवती फेऱ्या मारत असताना कधी कधी आपल्या कोल्हापूर वरूनही जाते आणि ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो, आणि आनंदाची बाब अशी कि आज सायंकाळी ७.३0 वाजता ही संधी मिळणार आहे.
डॉ. अविराज जत्राटकर,
खगोल अभ्यासक, कोल्हापूर
 


आंतराष्ट्रीय अवकाश स्थानक (आयएसएस)

पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत फिरणारी आणि मानवाला उघड्या डोळ्यांनी दिसणारी सर्वात मोठी मानवनिर्मित अवकाशीय वस्तू म्हणजे आंतराष्ट्रीय अवकाश स्थानक (आयएसएस). साधारणत: फुटबॉलच्या मैदानाएवढे आकाराने मोठे असणारे हे स्थानक पृथ्वी भोवती ४०० किलोमिटर उंचीवरून दिवसाला जवळपास १५ फेऱ्या पूर्ण करते. तासाला २७,७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० कि.मी. उंचीवर आहे. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रह असून, तो आतापर्यंतच्या कोणत्याही कृत्रिम उपग्रहापेक्षा खूप मोठा आहे.


२० नोव्हेंबर १९९८ पासून आतापर्यंत म्हणजे १९ वर्षांहून जास्त काळ ते त्याचे काम अतिशय उत्तम करत आले आहे. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, खागोलशास्त्र, हवामानशास्त्र इत्यादीबद्दल संशोधन आणि विविध चाचण्या करणे हे या स्थानकाचे उद्धिष्ट आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे अंतराळात बांधले गेलेले संशोधन केंद्र आहे. याचे बांधकाम १९९८ मध्ये चालू झाले. १९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालेले आहे, ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक आहे. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला आहे. अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि १० युरोपियन देशांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग आहे.

असे आहे हे अवकाश स्थानक

स्थानकाला रशियन आॅर्बिटल सेगमेंट (आरओएस) आणि युनायटेड स्टेट्स आॅर्बिटल सेगमेंट (युएसओएस) अशा दोन भागात विभागण्यात आले आहे. याची लांबी २४० फूट, तर रुंदी ३३६ फूट आहे. यामध्ये सहा व्यक्ती एका वेळेस राहण्याची व्यवस्था आहे. २ नोव्हेंबर २००० पासून या स्थानकात सलग १७ वर्षे, २०० दिवस अंतराळवीरांचे वास्तव्य आहे. आयएसएस २०२४ पर्यंत अनुदानित आहे आणि २०२८ पर्यंत कार्यरत राहण्याची शक्यता आहे.

या स्थानकाची बांधणी अवकाशातच करण्यात आली. निरनिराळ्या मोहिमांमध्ये अंतराळ स्थानकाचे सुटे भाग स्पेस शटल डिस्कव्हरी आणि इतर वाहने जसे स्पेस शटल अटलांटिस च्या मदतीनं तेथे नेण्यात आले. आधीच्या मोहीमेतील स्पेस-शटलमधून तेथे गेलेल्या अंतराळवीरांनी हे सुटे भाग मुख्य स्थानकाच्या यंत्रणेला जोडले आणि आवश्यक त्या यंत्रणा सुरू केल्या केल्या.

या स्थानकात जीवशास्त्र, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र आणि रसायनशास्त्रात केले जाणारे प्रयोग असतील. पृथ्वीवरील गुरुत्वीय बलामुळे येथे करता न येणारे प्रयोग या अंतराळ स्थानकात करण्यात येतात. या स्थानकावर, मंगळावरील मोहिमेसाठी माणूस पाठवता येण्याच्या उद्देशाने, वजनविरहित अवस्थेमध्ये मनुष्याचे वास्तव्य किती दिवस वाढवता येईल याचा अभ्यास केला जात आहे: संशोधन करण्यासाठी साधारणपणे दर सहा महिन्यांनी अंतराळवीरांचा नवा चमू पृथ्वीवरून पाठविला जातो.

 

Web Title: International holiday station will be celebrated by Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.