कोल्हापूरचा नेमबाज स्वरूप उन्हाळकरची पॅरा एशियन स्पर्धेसाठी निवड
By सचिन भोसले | Published: October 23, 2023 12:00 PM2023-10-23T12:00:49+5:302023-10-23T12:08:09+5:30
कोल्हापूर : हांगझोऊ, चीन मध्ये आज, सोमवारपासून सुरु होणाऱ्या एशियन पॅरा स्पर्धेसाठी कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वरूप उन्हाळकर याची भारतीय ...
कोल्हापूर : हांगझोऊ, चीन मध्ये आज, सोमवारपासून सुरु होणाऱ्या एशियन पॅरा स्पर्धेसाठी कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वरूप उन्हाळकर याची भारतीय संघात निवड झाली.
तो या स्पर्धेमध्ये १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एस.एच - १, १० मीटर एअर रायफल मिक्स प्रोन एस.एच - १, व ५० मीटर मिक्स प्रोन एस.एच - १, या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे. ही स्पर्धा फुयांग यिनहू स्पोर्ट्स सेंटर या शूटिंग रेंजमध्ये दिनांक २३ ते २६ ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे.
स्वरूपने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून दोन सुवर्ण एक रोप्य व दोन कास्य अशी आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके प्राप्त केली आहेत. स्वरूपच्या या क्रीडा कामगिरीमध्ये २०२२ मध्ये झालेल्या टोकियो २०२० या पॅराओलंपिक क्रीडा
स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल या क्रीडा प्रकारात चौथे स्थान मिळवले होते. याला राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य पुरस्काराने गौरविले आहे. त्याला प्रशिक्षक अजित पाटील व युवराज साळोखे यांचे प्रशिक्षण लाभले आहे. बालेवाडी, पुणे येथे गन फॉर ग्लोरी या अकॅडमी अंतर्गत प्रशिक्षक किरण खंदारे व पवन सिंग यांचा मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक सराव करीत आहे. तो कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पॅरालिम्पिक असोसिएशन व कोल्हापूर मेन अॅण्ड वूमेन असोसिएशनचा खेळाडू असून त्याला अनिल पोवार, आर. डी. आरळेकर, शंकरराव कुलकर्णी यांचे लाभले.