कोल्हापूरात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात

By admin | Published: June 21, 2017 07:12 PM2017-06-21T19:12:17+5:302017-06-21T19:12:17+5:30

तज्ज्ञांच्यावतीने योगाची प्रात्यक्षिके सादर

International Yoga Day in Kolhapur | कोल्हापूरात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात

कोल्हापूरात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २१ : आंतरराष्ट्रीय योगदिन बुधवारी शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. योगदिनानिमित्त शहरातील विद्यालय, महाविद्यालय, विविध सामाजिक संस्था या ठिकाणी तज्ज्ञांच्यावतीने योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

 

एन.सी.सी. भवन

पाच महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी कोल्हापूरतर्फे एन.सी.सी. भवन येथे आयोजित सीएटीसी कॅम्पमध्ये डॉ. विलास गोखले यांनी छात्रसैनिकांना योगाचे धडे दिले. या उपक्रमात ४०० छात्रसैनिकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमास कोल्हापूर एन.सी.सी ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर पी. एस. राणा, कॅम्प कमांडंट कर्नल डॉ. साजी अब्राहिम, ले. कर्नल सी. सी. डिसील्व्हा, मेजर मीनल शिंदे, मेजर के. एम. भोसले, सुभेदार मेजर श्रावण यादव, आदींसह पी. आय. स्टाप, ए. एम. ओ आदी उपस्थित होते. चाँदसाबवली भक्त मंडळ रविवार पेठ येथील चाँदसाबवली भक्त मंडळाच्यावतीने परिसरातील मुलांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात मंडळाचे अध्यक्ष विनायक चव्हाण, सिकंदर जमादार, प्रशांत सुतार, सुरेश कदम, अभिमन्यु पाटील, अर्जुन चव्हाण, रवींद्र कुलकर्णी, शैलेश नाळे, संग्राम पाटील आदी उपस्थित होते. श्री दत्ताबाळ हायस्कूल श्री दत्ताबाळ हायस्कूल येथे योगतज्ज्ञ विनय लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिके सादर केली तसेच परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी नीलेश देसाई, उपाध्यक्षा पल्लवी देसाई, मुख्याध्यापक डी. व्ही. पाटील, एस. बी. डवंग तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दत्ताबाळ हायस्कूल येथे विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज महासैनिक दरबार हॉल येथे आरोग्य भारती व आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे संयुक्त विद्यमाने आयोजित योगशिबिरात योगतज्ञ राजेश शेटे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, ‘आरोग्य भारती’च्या जिल्हाध्यक्षा डॉ. अश्विनी माळकर, पारस ओसवाल यांनी भारतमातेचे प्रतिमा पूजन केले तर योगशिक्षक सन्मती कब्बूर, शिल्पा कब्बूर यांनी योग प्रात्यक्षिके घेतली. कार्यक्रमास आयुर्वेद व्यासपीठ, आयुर्वेद रिसेलर्स असोसिएशन, कोल्हापूर आयुर्वेद असोसिएटस्, ब्राह्मण सभा करवीर, मर्म मार्ट आॅफ लिव्हींग हिमालय, यांचे सहकार्य लाभले. देशमुख इंग्लिश स्कूल श्री वसंतराव जयवंतराव देशमुख इंग्लिश स्कूल येथे योगप्रवीण विठ्ठल तांदळे यांनी मार्गदर्शन केले. योगाच्या जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका रूपाली पास्ते, पर्यवेक्षक सुरेश कांबळे, प्रशिक्षक संग्राम पाटील, भरत पाटील आदी उपस्थित होते. न्यू प्राथमिक विद्यालय श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू प्राथमिक विद्यालयात पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांकडून योगासनाची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. यावेळी संस्थेचे अजिव सेवक सी. एम. गायकवाड, मुख्याध्यापिका एस. आर. पाटील, मुख्याध्यापिका रेणू निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सह. शिक्षिका मीनल गोसावी, स्मिता पाटील यांनी योगासनाची प्रात्यक्षिके दाखवली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. शीलादेवी डी. शिंदे-सरकार विद्यापीठ सोसायटी संचलित शीलादेवी डी. शिंदे-सरकार हायस्कूलतर्फे योगदिनानिमित्त नाळे कॉलनी,

आयटीआय परिसरात योग जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी ज्येष्ठ शिक्षक एच. एम. गुळवणी, प्रभारी मुख्याध्यापक बी. डी. गोसावी, रघुनाथ घाटगे, डॉ. मोहन कावडे, प्रयोगशाळा सहाय्यक सीमा पाटील, डॉ. कावडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिक सादर केली. पामग्रोव्ह अपार्टमेंट संभाजीनगर येथील पामग्रोव्ह अपार्टमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजारा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी विविध योगांची प्रात्यक्षिक केली. यामध्ये समृद्धी पाटील, माधवी कर्नाड, अनिता जोशी, अपर्णा मगदूम, दीपाली पाटणकर, सोनल सासने, तेजश्री पाटील, शुभदा धर्माधिकारी, राजेश्वरी मगदूम, अनिता पाटील, पद्मा देव, माया वरुटे, प्रभा शेटे आदी उपस्थित होते.

संघवी विद्यालय शा. शेलाजी वनाजी संघवी विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगतज्ज्ञ सुरेंद्र देशपांडे यांनी आहाराचे महत्त्व सर्वांना सांगून योगाची प्रात्यक्षिक करून घेतली. यावेळी मुख्याध्यापिका सुप्रिया देशपांडे, लालासाहेब पाटील, सूर्यकांत बरगे, टी. एम. अत्तार, विद्यार्थी,शिक्षक, पालक उपस्थित होते. इंदूमती जाधव विद्यालय राजोपाध्येनगर परिसरातील इंदूमती जाधव विद्यालय, संकल्प इंग्लिश मेडियम स्कूल व प्रेरणा बालकमंदिरच्यावतीने आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष के. जी. पाटील यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक पी. वाय. पाटील, पी. एस. नाईक, तेजस्विनी स्वामी, सुनीत पाटील, सागर पाटील, लता टिपुगडे, राजेश कोंडेकर आदी उपस्थित होते.

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून न्यू इंग्लिश मेडिय स्कूलयेथे योगशिक्षिका डॉ. भाग्यश्री देसाई यांनी योगाचे महत्त्व सांगितले. यावेळी एन.सी.सी. ६ महाराष्ट्र बटालियनच्या जी.सी.आय.आय आॅफिसर नीशा भोसले, मुख्याध्यापिका शिवानी देसाई, पर्यवेक्षक राम जाधव, उज्ज्वला पाटील, अभय बकरे आदी उपस्थित होते.  विद्यापीठ हायस्कूल विद्यापीठ हायस्कूलमध्ये एअर एन.सी. सी. ट्रप १६ च्या कॅडेटमार्फत योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी. डी. कुंभार, कमांडिग आॅफिसर विंग कमांडर सी. वाय. महाजन, ओ. एन. सी.सी. आॅफिसर आर. व्ही. रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले. एन.सी.सी. द्वितीय वर्षाच्या ५० कॅडेटनी योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखविली.

Web Title: International Yoga Day in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.