‘सायबर’मध्ये इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:57 AM2019-02-04T00:57:40+5:302019-02-04T00:57:45+5:30

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ५१ महाविद्यालयांतील इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेलचे रविवारी जम्मू-काश्मीर येथून उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ...

Interpinership Development Cell in Cyber | ‘सायबर’मध्ये इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल

‘सायबर’मध्ये इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल

Next

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ५१ महाविद्यालयांतील इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेलचे रविवारी जम्मू-काश्मीर येथून उद्घाटन केले. यावेळी त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांच्या या संवादाने कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयातील उपस्थितही भारावून गेले.
‘राष्टÑीय उच्चतर शिक्षा अभियान’ या योजनेंतर्गत राज्यातील निवडक महाविद्यालयांमध्ये ‘सायबर’ महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. या अनुदानातून ‘सायबर’मध्ये ‘इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल व स्किल हब’सह देशभरातील अनुदानप्राप्त झालेल्या ५१ संस्थांमध्ये एकाचवेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘नॅशनल इंफोर्मेटिक सेंटर’च्या माध्यमातून रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, आमदार अमल महाडिक, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरूडॉ. डी. टी. शिर्के, ‘सायबर’चे विश्वस्त डॉ. आर. ए. शिंदे, डॉ. व्ही. एम. हिलगे, संचालक डॉ. एम. एम अली, आदी प्रमुख उपस्थित होते.
‘सायबर’मधील ‘ईडी सेल अ‍ॅँड स्किल हब’ या विभागाची अंतर्गत उद्योजकता विकासासाठी लागणाऱ्या सर्व सोईसुविधा, मार्गदर्शन, प्रशिक्षण व कौशल्य विकासासाठी लॅँग्वेज लॅब व मॅनेजमेंट लॅब, आदींचा समावेश करण्यात आला आहे. केंद्राद्वारे सर्व प्रकारच्या स्टार्टअपना ही समर्थन मिळणार आहे, अशी माहिती डॉ. विशाखा आपटे यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी योजनेचे समन्वयक डॉ. सी. एस. दळवी, डॉ. डी. आर. मोरे, प्रा. शंकरराव कुलकर्णी, ऋषिकेश श्ािंदे, प्रतिभा दीक्षित, दीपक भोसले आदींसह प्राध्यापक उपस्थित होते.

Web Title: Interpinership Development Cell in Cyber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.