दाखले वितरणाचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 04:42 PM2017-10-04T16:42:47+5:302017-10-04T16:56:23+5:30
विविध दाखल्यांच्या वितरणाबाबत शासनाने कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकष यांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. याच्या निषेधार्थ कोेल्हापूर जिल्ह्यातील तलाठ्यांनी सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार घातला आहे. बुधवारीही हा बहिष्कार कायम राहील्याने दाखले वितरणाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.
कोेल्हापूर : विविध दाखल्यांच्या वितरणाबाबत शासनाने कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकष यांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. याच्या निषेधार्थ कोेल्हापूर जिल्ह्यातील तलाठ्यांनी सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार घातला आहे. बुधवारीही हा बहिष्कार कायम राहील्याने दाखले वितरणाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.
या बहिष्कारामध्ये जिल्ह्यातील सुमारे ५५४ तलाठी सहभागी झाले आहेत. हा बहिष्कारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील दाखले वितरणाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन त्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत आहे. करवीर तहसिलदार कार्यालयातील चावडीसह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील चावड्यांमध्येही हेच चित्र दिसत होते. दाखल्यांपुरता बहिष्कार मर्यादीत असला तरी तलाठ्यांकडून महसूल यंत्रणेतील इतर कामकाज केले जात होते.
राज्य शासनाच्या विविध विभागांच्या वैयक्तिक / सामूहिक लाभाच्या योजना, संजय गांधी निराधार योजना, जिल्हा परिषद व कृषी विभागाकडील साहित्य वाटप, शैक्षणिक व आरक्षणविषयक सवलती वगैरे गोष्टींचा लाभ मिळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून तलाठी कार्यालयातून उत्पन्न, रहिवाशी, जातीचे, भूमिहीन शेतमजूर, आदी ३५ प्रकारचे दाखले दिले जात होते.
याकरिता प्रचलित पद्धतीनुसार सादर केलेली कागदपत्रे व स्थळपाहणी केली जात होती; परंतु शासनाने यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद व दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकष याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. त्यामुळे महाराष्टÑ राज्य तलाठी संघाने सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आहे.