कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी पन्हाळ्यावर मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 07:55 PM2021-07-09T19:55:12+5:302021-07-09T19:58:31+5:30
Zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छूक असणाऱ्यांच्या मुलाखती रविवारी किल्ले पन्हाळ्यावर घेण्यात येणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छूक असणाऱ्यांच्या मुलाखती रविवारी किल्ले पन्हाळ्यावर घेण्यात येणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.
या दोन्ही मंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर पाचारण केले होते. या बैठकीसाठी ४१ सदस्य उपस्थित होते. शिवसेनेचे अंबरिश घाटगे आणि कॉंग्रेसच्या रेश्मा राहूल देसाई या अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी सर्व सदस्यांना दोन्ही मंत्र्यांनी सुचना दिल्या. त्यानुसार हे सर्व सदस्य उद्या दुपारपर्यंत पन्हाळ्यावर दाखल होणार आहेत. रविवारी प्रमुख नेते मंडळी इच्छूकांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यानंतर सोमवारी नाव निश्चित केले जाणार आहे.
या बैठकीला खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राजू शेट्टी पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार के. पी. पाटील,चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजू लाटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.