पोट न उघडता करता येणार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 09:46 PM2017-08-01T21:46:59+5:302017-08-01T21:51:25+5:30

कोल्हापूर : पोटातील गाठ अथवा अन्य आजारांचे निदान करण्यासाठी शस्त्रक्रिया करताना आता मोठ्या प्रमाणात पोटाची फाडाफाड करावी लागणार नाही. कारण केवळ १० मिलिमीटर व्यासाचे मनगट आणि हातासारखे कार्य करणारे ‘फ्लेक्झिसर्ज’ नावाचे उपकरण कोल्हापूरचे डॉ. सुरेश देशपांडे यांनी विकसित केले आहे. त्याचे पेटंटही त्यांना मिळाले आहे. सहा महिन्यांत हे उपकरण जगभरातील डॉक्टरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Intestinal surgery can be done without opening the stomach | पोट न उघडता करता येणार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया

पोट न उघडता करता येणार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया

Next
ठळक मुद्देकोल्हापूरच्या डॉक्टर देशपांडे यांचे संशोधनहातासारखे कार्य करणाºया ‘फ्लेक्झिसर्ज’ उपकरणाचे मिळाले पेटंटसहा महिन्यांत जगभरातील डॉक्टरांच्या सेवेत दाखल होणार भारतीय बनावटीचे देशातील पहिले रोबोटिक आॅपरेशन थिएटरही तयारमाणसाचा आवाज हीच ओळखीची खूण


चंद्रकांत कित्तुरे

कोल्हापूर : पोटातील गाठ अथवा अन्य आजारांचे निदान करण्यासाठी शस्त्रक्रिया करताना आता मोठ्या प्रमाणात पोटाची फाडाफाड करावी लागणार नाही. कारण केवळ १० मिलिमीटर व्यासाचे मनगट आणि हातासारखे कार्य करणारे ‘फ्लेक्झिसर्ज’ नावाचे उपकरण कोल्हापूरचे डॉ. सुरेश देशपांडे यांनी विकसित केले आहे. त्याचे पेटंटही त्यांना मिळाले आहे. सहा महिन्यांत हे उपकरण जगभरातील डॉक्टरांच्या सेवेत दाखल होणार आहे.


डॉ. सुरेश देशपांडे हे वैद्यकीय उपकरणाच्या संशोधनात अग्रेसर असलेले एक नाव. कोल्हापुरात व्यवसाय करीत असतानाच शिवाजी विद्यापीठ, तसेच आयआयटी पवई येथे व्याख्याते म्हणूनही ते कार्यरत आहेत. इंडियन असोसिएशन आॅफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल इंडो सर्जन्सचे माजी अध्यक्ष असलेल्या डॉ. देशपांडे यांनी आतापर्यंत लॅप्रोस्कोपिक सर्जरीसाठी सहा नवी उपकरणे विकसित केली आहेत. ‘फ्लेक्झिसर्ज’ हे त्यांचे सातवे उपकरण आहे. या सर्व उपकरणांची पेटंट त्यांना मिळालेली आहेत.


पोटाच्या अवघड किंवा गुंंतागुंतीच्या शस्त्रकिया करताना मोठा छेद करून तेथे टाके घालावे लागतात. त्याचा रुग्णाला त्रास होतो. शिवाय डॉक्टरांनाही जादा श्रम करावे लागतात. हा त्रास कमी करण्यासाठी फ्लेक्झिसर्ज विकसित करण्यात आले आहे, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सागितले.


कसे करते काम? :

फ्लेक्झिसर्ज हे १० मिलिमीटर व्यासाचे उपकरण आहे. लॅप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करताना पोटाच्या तेवढ्याच भागाला छिद्र पाडून ते आत जाते. आतमध्ये मनगटासारखे सर्व दिशांनी फिरू शकते. पोटात पोकळीत शिरल्यानंतर हातासारखे वाकू शकते. त्याची ब्लेडस् ३६0 अंशात फिरतात. यामुळे कुठल्याही कोपºयातील नको असलेला भाग काढून टाकणे, तेथे टाके घालणे सुलभ होते. हे रोबोटिक उपकरण असल्याने हाताने वापरण्यासारखे आहे, असे डॉ. सुरेश देशपांडे यांनी सांगितले.


रोबोटिक आॅपरेशन थिएटर


डॉ. देशपांडे यांनी भारतीय बनावटीचे देशातील पहिले रोबोटिक आॅपरेशन थिएटरही तयार केले आहे. ज्यामध्ये या थिएटरमधील शस्त्रक्रियेसाठी लागणारी १५ ते २० उपकरणे एका माणसाच्या (डॉक्टरांच्या) सूचनाबरहुकूम काम करतात. त्या माणसाचा आवाज हीच त्यांच्यासाठी ओळखीची खूण असते.

डॉ. देशपांडे यांच्या कोल्हापुरातील रुग्णालयात असे थिएटर कार्यरत आहे. या संशोधनांचे पेटंटही त्यांना मिळाले आहे. त्यांनी ते जर्मनीतील एका कंपनीला अलीकडेच दिले आहे. या कंपनीकडून लवकरच अशी आॅपरेशन थिएटर्स जगभरात उपलब्ध होतील. यामुळे कर्मचाºयांची बचत तर होतेच शिवाय शस्त्रक्रियेत अचुकता येते, असेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

Web Title: Intestinal surgery can be done without opening the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.