चायनीज फुलांचे फुलशेतीवर आक्रमण-: सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:31 AM2019-02-14T00:31:32+5:302019-02-14T00:34:49+5:30

नसिम सनदी । कोल्हापूर : ऐन व्हॅलेंटाईन, लग्नसराईमध्ये फुलांची मागणी व दराने नीचांक गाठल्याने पॉलिहाउसमध्ये फूलशेती पिकविणाऱ्या शेतकºयांवर संक्रांत ...

Invasion of Chinese flowers: - Use of artificial flowers for decoration | चायनीज फुलांचे फुलशेतीवर आक्रमण-: सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर

चायनीज फुलांचे फुलशेतीवर आक्रमण-: सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर

Next
ठळक मुद्देपॉलिहाउसवर संक्रांत

नसिम सनदी ।
कोल्हापूर : ऐन व्हॅलेंटाईन, लग्नसराईमध्ये फुलांची मागणी व दराने नीचांक गाठल्याने पॉलिहाउसमध्ये फूलशेती पिकविणाऱ्या शेतकºयांवर संक्रांत ओढवली आहे. चायनीज कृत्रिम फुलांनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्याने खºया फुलांचा रंग फिका पडू लागला आहे.

लग्नसराईसह मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी जरबेरा, कार्नेशन, गुलाब या अस्सल फुलांची आरास केली जात असे. पण आता चिनी बनावटीच्या हुबेहूब दिसणारी आणि पुन्हा वापरता येणारी ही फुले सजावटीसाठी अधिक वापरली जात आहेत. खºया फुलांच्या तुलनेत त्यांचा दरही कमी असल्याने स्टेज डेकोरेटर्स यालाच अधिक प्राधान्य देत आहेत. या सर्वांचा परिणाम होऊन पॉलिहाउसमध्ये शेतकºयांनी मोठ्या कष्टाने घेतलेल्या फुलांना आता पुरेशी बाजारपेठेच उरलेली नाही. फुलांची मागणी झपाट्याने कमी होत आहे. शिवाय जे पॉलिहाऊसमधील फुले खरेदी करतात त्यांच्याकडून शेतकºयांना परवडणारा दरही मिळत नाही.

कवडीमोल दराने ही फुले विकावी लागत आहेत. पॉलिहाउसमध्ये फुलांची लागवड करण्यासाठी लागणारी खते, औषधे, पाणी, तोडणी मजुरी, पॅकिंग, माल पाठविण्यासाठीचे वाहतूक भाडे यांचा खर्च दिवसागणिक वाढत चालला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढत चालल्याने पॉलिहाउस बंद करण्याचा पर्याय शेतकरी जवळ करीत आहेत.

१५ रुपयांचे फूल ५० पैशांत
ऐन हंगामात १५ रुपयांना एक असे विकले जाणारे जरबेरा फूल आता
केवळ किमान ५० पैसे, तर जास्तीत जास्त दोन रुपयांपर्यंत विकले जात आहे. या फुलाच्या काढणीसाठीच दोन रुपयांचा खर्च येतो. घातलेला खर्चही विक्रीतून निघत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

फूलशेती संपण्याच्या मार्गावर : गुलाब, आॅक्रीड, जरबेरा, कार्नेशियन, डच रोझ, ग्लॅडीलिओस, शेवंती, झेंडू या फुलांसह स्पृंगेरी हे गवतही प्लास्टिकमध्ये तयार केले गेले आहे. चायनीज कंपनीने तयार केलेल्या फुलांनी खºया फूलशेतीवर आक्रमण करून त्यांचे अस्तित्वच संपविण्यास सुरुवात केली आहे.

 

पॉलिहाउसमध्ये फूलशेती केल्याने चांगला फायदा मिळतो, असा प्रचार झाल्याने फूलशेतीकडे वळलो; पण त्यातील फोलपणा लक्षात आल्यानंतर ती पूर्णपणे बंद केली आहे. निर्यातीची सोय असेल तरच फूलशेती परवडते. कृत्रिम फुलांच्या बाजारपेठेच्या विस्ताराला वाव दिल्याने शेतकºयांची वाताहत होत असून, शेतकरी विरोधी धोरणाचा पुनर्विचार व्हावा.
- मोहन खोत, पॉलिहाउस शेतकरी, रेंदाळ, ता. हातकणंगले.

Web Title: Invasion of Chinese flowers: - Use of artificial flowers for decoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.