कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापनदिन साधेपणाने करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:22 AM2021-03-24T04:22:00+5:302021-03-24T04:22:00+5:30
कोल्हापूर : कैलासगडची स्वारी मंदिराचा ६१ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष बबेराव ...
कोल्हापूर : कैलासगडची स्वारी मंदिराचा ६१ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव यांनी दिली.
मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिर म्हणजे करवीरवासीयांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराचा वर्धापन दिन सोहळा प्रत्येक वर्षी धूलिवंदन दिवशी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन, पारायण, महाप्रसाद असे कार्यक्रम असतात ; मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार हा सोहळा अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय मंदिर विश्वस्थ मंडळाने घेतला आहे.
यावेळी माजी नगरसेवक संभाजी जाधव, केशवराव पोवार, उदय कारंजगर, विलास गौड, अशोक मेस्त्री, पांडबा पोवार, बंडा यादव, किशोर भोसले, शिवाजी जाधव, विठ्ठलराव जाधव, गणेश भोसले, रोहित कारंडे आदी उपस्थित होते.