चंदगड जमीन हडप प्रकरणाची सखोल चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 08:07 PM2021-03-20T20:07:22+5:302021-03-20T20:09:28+5:30
collector kolhapur- चंदगड तालुक्यातील शेकडो एकर शासकीय जमीन ही महसूल व अन्य शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने परस्पर खासगी लोकांच्या नावावर केली आहे. या जमीन घोटाळ्यातील काही अटक झाले, पण पेशाने डॉक्टर असलेला मुख्यसूत्रधार हा अद्याप मोकाट फिरत असल्याने त्याच्यावरही कारवाई करून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने शनिवारी दुपारी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे केली.
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील शेकडो एकर शासकीय जमीन ही महसूल व अन्य शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने परस्पर खासगी लोकांच्या नावावर केली आहे. या जमीन घोटाळ्यातील काही अटक झाले, पण पेशाने डॉक्टर असलेला मुख्यसूत्रधार हा अद्याप मोकाट फिरत असल्याने त्याच्यावरही कारवाई करून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने शनिवारी दुपारी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले की, चंदगड तालुक्यातील जमीन घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार हे पेशाने डॉक्टर आहे. ती व्यक्ती कोल्हापुरातील व्यक्ती असून, तिच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
शासकीय जमीन म्हणजे देशाची, राज्याची म्हणजेच जनतेची मालमत्ता आहे. ती अशा प्रकारे कोणतरी दरोडा घालून लुटले असेल तर ते जनतेचे नुकसानच होईल. त्यामुळे अशा शासकीय मालमत्ता हडप केली जात असेल तर ती पुन्हा शासनाच्या ताब्यात घेणे गरजेचे होय. त्याबाबत कोणत्याही दबावाला आपल्या यंत्रणेचे बळी न घडता जो कोणी गुन्हेगार आहे. त्यांच्यावर लवकरच करवाई करून जनतेला सहकार्य करावे. अन्यथा राज्याचा मालमत्ता माजविण्यासाठी सनदशीर मार्गाने उतरावे लागेल.
या बैठकीस, अशोक पेवार, रमेश मोरे, विनोद डुणूंग, रमाकांत आनग्रे, चंद्राकात पाटील, शंकराराव शळके, राजेश वरक, श्रीकांत भोसले, महदेव पाटील, किशोर घाटगे, सुभषा देयाव, सुभाष देसाई, अंजूम देसाई यांच्यासह पो.नि. लहू शिंदे, पी. गवळी आदी उपस्थित होते.