कंत्राटी कामगारांचा ठेका घेणाऱ्या कंपनीची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:30+5:302021-06-24T04:17:30+5:30
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी ...
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाचे राजू शेळके यांच्यासह शिष्टमंडळाने हे निवेदन कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे सुपूर्द केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांना कंत्राटी कामगार कायदा लागू असूनही या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकण्याबरोबरच त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन व कामगार भविष्य निर्वाह निधीही कंत्राटी कायद्याप्रमाणे दिले जात नाही.
याबाबत ठेकेदार आणि ठेका घेणाऱ्या कंपन्यांची पाठराखण करणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, कंत्राटी कामगाराची आर्थिक लूट थांबवून त्यांच्या कष्टाचे वेतन आणि भविष्य निर्वाह निधी हा कंत्राटी कायद्याप्रमाणे द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर राष्ट्रीय बहुजन महासंघाचे सचिव संदीप कांबळे, संस्थापक अध्यक्ष राजीव सोरटे आणि तुकाराम कांबळे, सदस्य सतीश कासे, शीतलकुमार गवंडी, स्वाती किल्लेदार, अलका देवळकर, प्रकाश पाटील, आमीर सलगर, रूपाली पोवार, अर्जुन कासे, समृद्धी वानखेडे, आदींच्या सह्या आहेत.
------------------------------------------------------------------
(बातमीदार : संदीप आडनाईक)
फोटो : 23062021-kol-Rastriya bahujan mahasangh
फोटो ओळ : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाचे राजू शेळके यांच्यासह शिष्टमंडळाने हे निवेदन कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे सुपूर्द केले.
===Photopath===
230621\23kol_2_23062021_5.jpg
===Caption===
23062021-kol-Rastriya bahujan mahasangh फोटो ओळ : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाचे राजू शेळके यांच्यासह शिष्टमंडळाने हे निवेदन कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी भाउसाहेब गलांडे यांच्याकडे सुपूर्द केले.