पिशवी येथील गायरानातील आगीची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:37 AM2021-02-23T04:37:55+5:302021-02-23T04:37:55+5:30
झाड फौंडेशनच्या वतीने शाहूवाडी तहसीलदार, गटविकास अधिकारी व मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गायरान ...
झाड फौंडेशनच्या वतीने शाहूवाडी तहसीलदार, गटविकास अधिकारी व मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गायरान जमीन गट क्र. ११९७ मध्ये राज्य व केंद्र शासनाच्या पर्यावरणपूरक योजना अभियानांतर्गत हरित सेना, झाड फौंडेशन, ग्रा. पं. तसेच महसूल विभागाच्या वतीने सन २०११ ते २०२० या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. याच जमिनीमध्ये १६ फेब्रुवारीला काही अज्ञात व्यक्तींच्या बेजबाबदारपणामुळे आग लागून त्याचे रूपांतर वणव्यात होऊन या जमिनीमधील नैसर्गिक संसाधन, दुर्मीळ वृक्ष, वनस्पती मोठ्या प्रमाणात आगीत भस्मसात झाले आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करून यामधील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, असेही शेवटी या निवेदनात म्हटले आहे.