निगवेतील घंटागाडी खरेदीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:22 AM2021-03-18T04:22:55+5:302021-03-18T04:22:55+5:30

१४ व्या वित्त आयोगामधून घंटागाडीकरिता ५ लाख ५० ची तरतूद केली गेली होती. त्या तरतुदीप्रमाणे मागील ग्रामपंचायत सदस्य यांनी ...

Investigate the purchase of a bell cart in Nigwe | निगवेतील घंटागाडी खरेदीची चौकशी करा

निगवेतील घंटागाडी खरेदीची चौकशी करा

Next

१४ व्या वित्त आयोगामधून घंटागाडीकरिता ५ लाख ५० ची तरतूद केली गेली होती. त्या तरतुदीप्रमाणे मागील ग्रामपंचायत सदस्य यांनी १८ मार्च २०२० रोजी ई टेंडर प्रसिद्ध केले होते; पण २३ मार्च २०२० पासून कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने टेंडर प्रकिया थांबली गेली. यानंतर ग्रामपंचायतीवर प्रशासक यांची नियुक्ती झाली. प्रशासक व ग्रामसेवक यांना मागील ग्रामपंचायत सदस्यांनी नवीन ग्रामपंचायत सदस्य हजर होत नाहीत तोपर्यंत कोणतीही खरेदी करू नये असे वारंवार सांगूनदेखील प्रशासक व ग्रामसेवक यांनी मनमानी करून ही घंटागाडी खरेदी केली. मात्र, या खरेदी किमतीत तफावत असल्याने याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य महादेव पाटील-खाटांगळे, आकाराम चौगले, पवन तोरसकर, रमेश पाटील, सुहास जासूद, रोहित जासूद यांच्या सह्या आहेत.

Web Title: Investigate the purchase of a bell cart in Nigwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.