बेनिक्रेतील कामाची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:40+5:302021-03-13T04:44:40+5:30

म्हाकवेः बेनिक्रे (ता. कागल) येथे दिव्यज्योती कला व क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातील युवकांच्या सोयीसाठी लोकवर्गणी व श्रमदानातून व्यायामशाळा, ...

Investigate the work in Benicre | बेनिक्रेतील कामाची चौकशी करा

बेनिक्रेतील कामाची चौकशी करा

Next

म्हाकवेः

बेनिक्रे (ता. कागल) येथे दिव्यज्योती कला व क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातील युवकांच्या सोयीसाठी लोकवर्गणी व श्रमदानातून व्यायामशाळा, स्वीमिंग टँक, क्रीडांगण केले आहे. याच्या सभोवती संरक्षण भिंतही बांधली आहे. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. तसेच, गावातून येणारे गटारीचे कामही अर्धवटच ठेवले आहे. त्यामुळे पावसाळ्यात गावातून येणाऱ्या पाण्याचाही व्यायामशाळेला धोका संभवतो. त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी येथील दिव्यज्योती कला क्रीडा तरुण मंडळच्या कार्यकर्त्यांनी लेखी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शाखा अभियंता यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे व गटारी बांधण्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराने काम अर्धवटच ठेवले.

यापूर्वी पुरामुळे पूर्व-पश्चिम संरक्षक भिंत पडली आहे. या कामाची संबंधितांनी त्वरित चौकशी करावी, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर उपोषण करू, असा इशाराही मंडळाचे संस्थापक रमेश पाटील, अध्यक्ष वसंत चौगले यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.

कँप्शन

बेनिक्रे (ता. कागल) येथे ठेकेदाराने गटारीचे ठेवलेले अर्धवट काम.

छाया : साताप्पा चव्हाण, बेनिक्रे.

Web Title: Investigate the work in Benicre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.