‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ९५ हजार घरांचा सर्व्हे : चार लाखांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 04:58 PM2020-04-14T16:58:58+5:302020-04-14T17:00:43+5:30
कोल्हापूर : ‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने शहरातील ९५ हजार ९२३ घरांचा सर्व्हे पूर्ण केला असून, यामध्ये ४ लाख ...
कोल्हापूर : ‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने शहरातील ९५ हजार ९२३ घरांचा सर्व्हे पूर्ण केला असून, यामध्ये ४ लाख १४ हजार ३६७ नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. सोमवारी दिवसभरामध्ये ६ हजार ८०७ घरांचे सर्वेक्षण केले असून, यामध्ये ३१ हजार ७५८ नागरिकांची तपासणी केली.
सर्दी, खोकला, ताप यांची लक्षणे असल्याबाबत विचारणा करण्यात आली.
भक्तिपूजानगर, गजानन महाराज नगर, वारे वसाहत, जवाहर नगर, मंगळवार पेठ, एस. टी. कॉलनी, शाहू मिल कॉलनी, यादवनगर, मातंग वसाहत, शाहूपुरी, शाहूनगर, जागृतीनगर, मराठा कॉलनी, घोरपडे गल्ली, इंदिरानगर, भोसलेवाडी, कदमवाडी, सदरबाजार, विचारेमाळ, बापट कॅम्प, जाधववाडी, जिवबानाना पार्क, हरीओम नगर, बिंदू चौक, राजेबागस्वार दर्गा, सिध्दार्थ नगर, शहाजी वसाहत, आयरेकर गल्ली, ब्रह्मेश्वर पार्क, विजयनगर माकडवाला वसाहत, टेंबलाई नाका, विक्रमनगर, टेंबलाईवाडी या ठिकाणी सोमवारी आरोग्य तपासणी करण्यात आली.