कोल्हापुरातील मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलची शासनाकडून चौकशी

By विश्वास पाटील | Published: April 6, 2023 10:19 AM2023-04-06T10:19:23+5:302023-04-06T10:19:37+5:30

चौकशी समितीमधे आरोग्य विभागातील मुंबई, पुणे व कोल्हापूर मधील सचिव व तत्सम स्तरावरील अधिकारी आहेत.

Investigation of Multispecialty Hospital in Kolhapur by Goverment | कोल्हापुरातील मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलची शासनाकडून चौकशी

कोल्हापुरातील मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलची शासनाकडून चौकशी

googlenewsNext

कोल्हापूर - येथील एका नामवंत मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलची चौकशी करण्यासाठी येथे गुरुवारी सकाळी आरोग्य अधिकाऱ्यांचे  पथक धडकले आहे. या हॉस्पिटलबाबत शासनाकडे थेट तक्रार करण्यात आल्या असून यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने शासन स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करुन या समितीमार्फत ही चौकशी करण्यात येत आहे.

या चौकशी समितीमधे आरोग्य विभागातील मुंबई, पुणे व कोल्हापूर मधील सचिव व तत्सम स्तरावरील अधिकारी आहेत. यासंदर्भात हाॅस्पिटलच्या व्यवस्थापनाला चौकशीची नोटीस बजावली असून कोल्हापूरमधील आरोग्य विभागाच्या कार्यालयात ही चौकशी इनकॅमेरा होणार असून  त्यासंदर्भात  कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे. शासनाच्या योजनांचा लाभ देताना त्यात काही गैरप्रकार झाल्यात का याविषयी चौकशी होणार असल्याचे समजते.

Web Title: Investigation of Multispecialty Hospital in Kolhapur by Goverment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.