हुपरीतील नेर्लेकर यांच्या दारात गुंतवणूकदारांचा ठिय्या; शेगडी, जेवणाच्या साहित्यासह ठोकला तळ

By विश्वास पाटील | Published: January 29, 2024 08:27 AM2024-01-29T08:27:59+5:302024-01-29T08:28:24+5:30

दामदुप्पटचे आमिष

Investors knock on Nerlekar's doorstep in Hupari; Grilled bottom with cooking ingredients | हुपरीतील नेर्लेकर यांच्या दारात गुंतवणूकदारांचा ठिय्या; शेगडी, जेवणाच्या साहित्यासह ठोकला तळ

हुपरीतील नेर्लेकर यांच्या दारात गुंतवणूकदारांचा ठिय्या; शेगडी, जेवणाच्या साहित्यासह ठोकला तळ

कोल्हापूर : दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा करून त्याचा परतावा तरी दिला नाहीच परंतू आता मुद्दलही परत द्यायला टाळाटाळ करत असल्याने हुपरी (ता.हातकगणंगले) येथील राजेंद्र भिमराव नेर्लेकर याच्या शिवाजी चौकातील घरासमोर सुमारे तीसहून अधिक गुंतवणूकदारांनी रविवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यांनी जेवणाचे साहित्य, शेगडी सोबत नेली असून पैसे दिल्याशिवाय दारातून उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

उत्तूर (ता.आजरा) येथील देशभूषण देशमाने यांच्या ओळखीच्या माध्यमातून नेर्लेकर यांच्याकडे अनेकांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे देशमाने यांच्यासह इचलकरंजी, हातकणंगले, उत्तूर, गडहिंग्लज,राधानगरी, कागल, कोल्हापूर शहर, निपाणी येथील लोकांचा महिलांसह ठिय्या मारलेल्यांत समावेश आहे. गेल्या ऐन दिवाळीतही त्यांनी असाच ठिय्या मारला होता. परंतू नेर्लेकर यांने कधी पोलिस, कधी राजकीय नेते तर कधी दोन नंबरच्या व्यवहारातील गुंडांना मध्यस्थी करायला लावून पैसे परत करण्याची हमी दिली आणि आंदोलन मोडून काढले. त्यातील कांहीनी मध्यस्थी करून त्याच्याकडून पैसे उकळले परंतू गुंतवणूकदारांना दिलेच नाहीत. त्याने रिअल इस्टेट, क्रिप्टो करन्सी, शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करून वेगवेगळी आमिषे दाखवून लोकांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतल्याची लोकांची तक्रार आहे. हे सर्व सुशिक्षित लोक असून पैसे द्या नाहीतर आम्ही दारातून उठणार नाही असा निर्धार करूनच त्यांनी हा ठिय्या मारला आहे. स्वत: नेर्लेकर घरी नाही. परंतू त्यांच्या पत्नीने चर्चेला बोलवले. त्यास लोकांनी नकार दिला. पैसे कधी देणार ते सांगा, आता कोणतेही चर्चा नाही की कुणाची मध्यस्थी नाही. आम्ही शांततेत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात निमित्तसागर महाराजांचे उपोषण

गेल्या महिन्यात नेर्लेकर यांच्याकडून फसवणूक झाली म्हणून जैन समाजातील निमित्तसागर महाराज १८ डिसेंबरला त्यांच्या दारात आमरण उपोषणाला बसले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना अगोदर साडेतीनशे कोटींची फसवणूक झाल्याचा तोंडी आरोप केला. प्रत्यक्षात नंतर त्या्ंनी बँकेच्या माध्यमातून नेर्लेकर यांना दिलेली रक्कम २३ कोटी असल्याचे चर्चेत सांगितले परंतू त्यांच्या उपोषणात महावीर गाट व दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून २० डिसेंबरला त्यांचे उपोषण सोडले. त्यावेळी ४० लाखांवर हा तोडगा निघाल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतू ती रक्कमही महाराजांना दिली आहे की नाही आणि सध्या ते महाराज कुठे आहेत याचा थांगपत्ता नाही.

Web Title: Investors knock on Nerlekar's doorstep in Hupari; Grilled bottom with cooking ingredients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.