मोठ्या रकमा अडकलेले गुंतवणूकदार हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:21 AM2021-04-19T04:21:19+5:302021-04-19T04:21:19+5:30
संतोष पोवाळकर ज्या पेट्रोल पंपावर काम करत होता तथेही घोटाळा केल्याचे सांगण्यात येत आहे. मालकाने काढून टाकल्यानंतर त्याने बालिंगा ...
संतोष पोवाळकर ज्या पेट्रोल पंपावर काम करत होता तथेही घोटाळा केल्याचे सांगण्यात येत आहे. मालकाने काढून टाकल्यानंतर त्याने बालिंगा येथे कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर दुकान गाळा घेऊन प्रथम किराणा मालाचे दुकान सुरू केले. यानंतर तो सराफा व्यवसायात कसा आला याचा कोणीच अभ्यास केला नाही. चकाचक दुकान गाळ्यात सोने-चांदी खरेदी विक्रीचा व्यवहार करत करत पिग्मी, सुवर्ण ठेव, सोने तारण कर्ज, याच्या आडून सावकारकी असे व्यवहार सुरू केले.
प्रथम पिग्मी व सुवर्ण ठेव यातून चांगला व्याजाचा परतावा देत लोकांचा विश्वास प्राप्त केला. महिलांना सोन्याचा हव्यास असल्याने गुंतवणुकीचा ओघ वाढला. यातून सोने तारण कर्जे व सावकारी सुरू झाली. सोने-चांदी खरेदी-विक्रीपेक्षा सावकारकीबरोबर भिशी, पिग्मीची दररोज लाखोंची उलाढाल होत होती. अनेक सावकार व बिल्डरांनी सराफाकडे आपले पैसे व्याजाच्या हव्यासापोटी दिले. व्याजाचा परतावा मिळत असल्याने अशा लोकांकडून आपले पैसे संतोष पोवाळकरकडे येऊ लागले. या रकमा ५० ते ६० लाख रुपयांच्या पटीत आहेत; पण आता तक्रार करायला जावे तर एवढी मोठी रक्कम आणली कोठून याची चौकशी होणार, काहींच्या घरात, गावात कळणार आणि पैसे गेले; पण नामुष्की येणार या भीतीपोटी काहीजण समोर येत नाहीत, हे सत्य समोर आले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून पोबारा करण्याची तयारी
सराफ सतीश पोवाळकरचे किराणा मालाचे दुकान होते. सहा महिन्यांपूर्वी त्याने ते बंद केले. याशिवाय गेल्या सहा महिन्यांपासून तू कोणताही ऑनलाइन व्यवहार करत नव्हता. काही लोकांकडून अडचण आहे. सोने द्या व्याज देतो तर काहींकडून पैसे घेतले आहेत. नियोजनपूर्वक त्याने सर्व घबाड गोळा करून पोबारा केल्याची चर्चा आहे.