कचरा वाहतुक अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:01 PM2017-08-10T15:01:20+5:302017-08-10T15:13:59+5:30
कोल्हापूर : लाईनबाजारमधील झुम प्रकल्पावरील विघटन न होणाºया कचºयाची होत असलेली वाहतुक अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. उघड्या डंपर व ट्रकमधून वाहतुक केला जाणारा कचरा रस्त्यावर पडत असल्याने वाहने घसरण्याचे प्रकार घडत असून त्यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. भविष्यात अपघात टाळायचे असतील तर महानगरपालिका प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

संपूर्ण कोल्हापूर शहरातील कचरा झुम प्रकल्पांवर साठविला जातो. गेल्या दोन अडीच वर्षापासून या कचºयाची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावली गेली नसल्याने हा कचरा तसाच पडून होता. कचºयाचे ढीगच्या ढीग साचल्याने लाईनबाजार, कसबा बावडा परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले होते. हा कचरा तेथून हटविण्यात यावा, अशी मागणी नागरीकांकडून होत होती. त्यामुळे हा कचरा त्याठिकाणाहून हलविण्यात येत आहे.
झुम प्रकल्पातील हा विघटन न होणारा कचरा लाईनबाजार येथून राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या सरवळीत टाकला जात आहे. उठाव करण्याचा ठेका देण्यात आला आहे. ठेकेदाराने कचरा वाहतुक करण्याकरीता उघडे डंपर घेतले असल्याने कचरा नेत असताना तो वाºयामुळे तसेच हादºयामुळे डंपरमधील कचरा उडून तो खाली रस्त्यावर पडत असतो.
डंपरच्या मागून जाणाºया दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर कचरा पडतो. त्यातील बारीक कण डोळ्यातही जातात. तसेच चारचाकी वाहनांवरही हा कचरा पडतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सद्या पावसाळा असल्याने रस्त्यावर पडलेल्या कचºयामुळे रस्ता निसरटा होतो. दुचाकी घसरुन वाहनधारक जखमी होण्याचा संभव आहे.
उघड्या ट्रकमधून होत असलेल्या या कचरा वाहतुकीचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा. यामुळे छोटे छोटे अपघात झाले आहेत. भविष्यात अपघातामुळे जीवीत हानी होण्याची प्रतिक्षा न करता कचरा रस्त्यावर पडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
ट्रकमधून वाहतुक केला जात असलेला कचरा वाºयाच्या प्रवाहाने रस्त्यावर पडतो हे खरे आहे. आमच्याकडे तक्रारी आल्यापासून दररोज रस्ते लोटण्यासाठी कसबा बावडा ते शिये पुलापर्यंत कर्मचारी नेमले आहेत.
डॉ. विजय पाटील,