‘आर्ची’साठी इस्लामपूरकर ‘सैराट’

By admin | Published: August 2, 2016 01:18 AM2016-08-02T01:18:45+5:302016-08-02T01:19:32+5:30

अंबाबाई उद्यानाचे उद्घाटन : रिंकूसारखे बना, पण अभ्यास करा : अण्णासाहेब डांगे

Islamapurkar's 'Sarat' for 'Archie' | ‘आर्ची’साठी इस्लामपूरकर ‘सैराट’

‘आर्ची’साठी इस्लामपूरकर ‘सैराट’

Next

इस्लामपूर : शहरात ‘सैराट’फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू येणार म्हटल्यावर अंबाबाई उद्यान परिसरात दुपारी एकपासून हजारो तरुण-तरुणी सैराट झाल्या होत्या. तब्बल दोन तास उशिरा येऊनही आणि भरपावसातही इस्लामपूर पालिकेने तयार केलेल्या अंबाबाई उद्यानाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सैराट झालेल्या तरुणाईला रिंकूसारखे बना, पण अभ्यास करा, असा सल्ला दिला.
आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘सैराट’फेम रिंकू येणार म्हटल्यावर इस्लामपूर शहरच सैराट झाले आहे. नागरिकांनी या उद्यानाचा लाभ घ्यावा. शहरामध्ये विविध विकासकामे करण्याचा आमचा संकल्प आहे.
पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील म्हणाले, या उद्यानाचे आपण लोकार्पण करत आहोत. या उद्यानासाठी चार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यासाठी नाममात्र तिकीट दर ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
अभिनेत्री रिंकू राजगुरुने उद्यानाचे कौतुक करुन अभिनयाबरोबर स्वत:चे शिक्षणही पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी विजयभाऊ पाटील, माजी नगरसेवक विजय कोळेकर आणि उद्यानाचे काम करणारे ठेकेदार यांचा सत्कार आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
नियोजन समिती सभापती खंडेराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक शहाजीबापू पाटील यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, चंद्रकांत पाटील, शंकर चव्हाण, पीरअल्ली पुणेकर, मिनाज मुल्ला उपस्थित होते. (प्रतिनिधी)


पावसाचा जोर : उत्साहावर विरजण
इस्लामपुरातील अंबिका उद्यान उद्घाटनासाठी आर्ची येणार म्हटल्यावर तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परंतु ऐन कार्यक्रमापूर्वी पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम १0 ते १५ मिनिटातच आटोपता घेण्यात आला. त्यामुळे तरुणांच्या उत्साहावर विरजण पडले. यावेळी गर्दीमुळे नागरिकांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली.

Web Title: Islamapurkar's 'Sarat' for 'Archie'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.