गडहिंग्लज शहर कोल्हापूर जिल्ह्यात नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:16 AM2021-07-08T04:16:29+5:302021-07-08T04:16:29+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर कोल्हापूर जिल्ह्यात नाही का, असा सवाल विचारतानाच कोल्हापूर शहराप्रमाणे गडहिंग्लज शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, ...

Isn't Gadhinglaj city in Kolhapur district? | गडहिंग्लज शहर कोल्हापूर जिल्ह्यात नाही का?

गडहिंग्लज शहर कोल्हापूर जिल्ह्यात नाही का?

Next

गडहिंग्लज :

गडहिंग्लज शहर कोल्हापूर जिल्ह्यात नाही का, असा सवाल विचारतानाच कोल्हापूर शहराप्रमाणे गडहिंग्लज शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

प्रांतकचेरीचे नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले आहे, गेल्या तीन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. कर्जाचे हप्ते, भांडवल, वीज बिल, कामगारांचे पगार, जागाभाडे यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.

आजपर्यंत गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांनी प्रशासनाला खूप सहकार्य केले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्याची दक्षता घेतली जाईल, अशी हमी निवेदनातून देण्यात आली आहे.

शिष्टमंडळात, कार्याध्यक्ष राजेश बोरगावे, संजय खोत, श्रीनिवास वेर्णेकर, रामदास कुराडे, प्रवीण पावले, युनूस नाईकवाडे, अरुण जाधव आदींसह सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

फोटो ओळी : गडहिंग्लज प्रांतकचेरीचे नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना राजेश बोरगावे यांनी निवेदन दिले. यावेळी श्रीनिवास वेर्णेकर, युनूस नाईकवाडे, अरुण जाधव, प्रवीण पावले आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०७०७२०२१-गड-०१

Web Title: Isn't Gadhinglaj city in Kolhapur district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.