कागलमध्ये बहरली इस्रायली तंत्रज्ञानाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:29 AM2021-08-14T04:29:52+5:302021-08-14T04:29:52+5:30

कागल : येथील दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय कागलने दोन एकर मुरमाड ...

Israeli technology farming flourishes in Kagal | कागलमध्ये बहरली इस्रायली तंत्रज्ञानाची शेती

कागलमध्ये बहरली इस्रायली तंत्रज्ञानाची शेती

Next

कागल :

येथील दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय कागलने दोन एकर मुरमाड जमिनीवर इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, नारळ अशा विविध झाडांची लागवड केली आहे. कमी जागेत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन हे या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. अजून काही झाडांना फळे येणे बाकी असूनही पहिल्या वर्षातच दोन एकरात दहा लाखांचे उत्पादन निघाले आहे.

विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबरच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यासाठी हा अभिनव उपक्रम राबविला असल्याचे संस्थेचे सचिव प्रताप ऊर्फ भैया माने व उपाध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले.

गेल्या दोन लॉकडाऊनच्या काळातही कृषी तंत्रज्ञानाची ही शेतीशाळा सुरूच होती. एरवी दोन चार कुशल कामगार घेऊन संस्थेला ही शेती सहजपणे करता आली असती; परंतु केवळ विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, यासाठी हा प्रयोग करण्यात आला व तो यशस्वीही ठरला आहे. या कृषी तंत्र विद्यालयाने नॅडप कंपोस्ट, गांडूळ खत, आळंबी उत्पादन, शेळीपालन, गायी-म्हशींचे गोठे, असे प्रकल्प राबवले आहेत. यातून येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कार्यानुभव मिळत आहे.

चौकट

एक एकरात ६५० आंब्याची झाडे

साधारणपणे आपल्याकडे एकरी चाळीस आंब्याची रोपे लावतात; पण या इस्त्रायल तंत्रज्ञानाने एक ६५० रोपे बसतात. विशेष म्हणजे सहा फुटांच्या वर उंची व रुंदी वाढू नये यासाठी या झाडांची छाटणी केली जाते. जंबोकेशर ही जात लावून परागीभवनसाठी रत्ना, हापूस, अशा जातींची रोपे लावण्यात आली आहेत. ४०० ते ५०० ग्रॅमचा अंबा तर २५० ते ३०० ग्रॅमचा पेरू उत्पादित होत आहे. पेरू, सीताफळ, चिकू, कलिंगड, झेंडू, सोयाबीन, भाजीपाला, फुले तसेच सभोवती कोनोकार्पस या विदेशी वनस्पतीचे नैसर्गिक कुंपण केले आहे. बांधावर नारळ, पपई, झाडे आहेत. एवढे असूनही सभोवती चारचाकी वाहन पावसाळ्यातही फिरू शकते. अशी रचना आहे.

फोटो

कागल येथील कृषी तंत्र विद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानासाठी इस्रायल तंत्रज्ञानाची शेती करण्यात आली आहे.

Web Title: Israeli technology farming flourishes in Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.