कोरोना निवारण मदत केंद्रचालकांना प्रवास परवाने द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:22 AM2021-05-16T04:22:55+5:302021-05-16T04:22:55+5:30
निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील ऐनापूर, बेळगुंदी, गिजवणे, भडगाव, जरळी, दुंडगे, औरनाळ, हेब्बाळ क॥नूल, याठिकाणी मदत केंद्र सुरू ...
Next
निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील ऐनापूर, बेळगुंदी, गिजवणे, भडगाव, जरळी, दुंडगे, औरनाळ, हेब्बाळ क॥नूल, याठिकाणी मदत केंद्र सुरू आहे. केंद्रातर्फे कोरोना प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक औषधे वाटप, समुपदेशन, रुग्णांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व उपचार आदी कार्य केले जाते.
याकामी केंद्रचालकांना आवश्यकतेनुसार तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना लॉकडाऊनमध्ये आरोग्य व अत्यावश्यक सेवा श्रेणीखाली प्रवास परवाने द्यावेत.
निवेदनावर संघटनेचे मदन देशपांडे, सुनील कराळे, अरविंद कणसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.