‘मी केआयटीयन’ भावनेने एकमेकांना मदत करणे सहज शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:28+5:302021-08-12T04:27:28+5:30
‘केआयटी’मधील ‘संवाद माजी विद्यार्थ्यांशी’ उपक्रमांतर्गत त्यांनी संवाद साधला. एमबीए विद्यार्थ्यांची माजी विद्यार्थी संघटना सक्षम करून परस्पर सहकार्यातून एकमेकांचा विकास ...
‘केआयटी’मधील ‘संवाद माजी विद्यार्थ्यांशी’ उपक्रमांतर्गत त्यांनी संवाद साधला. एमबीए विद्यार्थ्यांची माजी विद्यार्थी संघटना सक्षम करून परस्पर सहकार्यातून एकमेकांचा विकास साधता येईल. केआयटीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी हे सबंध देशभरातून वेगवेगळ्या स्तरातून येतात. त्याबाबतचा अभ्यास करून विद्यार्थीपूरक निर्णय घेता येतील, असे मनोज फराकटे यांनी सांगितले. केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, आयएमईआर संचालक विश्वस्त सचिन मेनन यांनी फराकटे यांच्याशी संवाद साधून केआयटी आणि माजी विद्यार्थी संघटनेसाठी प्रयत्न करण्याचा विश्वास दिला. यावेळी केआयटी आयएमईआर संचालक डॉ. एस. एम. खाडिलकर उपस्थित होते.
चौकट
संवाद शृंखलेचे आयोजन
यशाची शिखरे पादाक्रांत केलेल्या माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये बोलावून त्यांच्याशी संवाद साधणे, महाविद्यालयाचा विकास, नवनवीन उपक्रमासंबंधी चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून ‘माजी विद्यार्थ्यांशी संवाद’ ही संवाद शृंखला केआयटीने आयोजित केल्याचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी सांगितले.
फोटो (१००८२०२१-कोल-मनोज फराकटे केआयटी) : कोल्हापुरात मंगळवारी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांचे स्वागत केआयटीचे अध्यक्ष सुनील फराकटे यांनी केले. यावेळी शेजारी सचिन मेनन, दीपक चौगुले, रोशनी दुधाणे, साजिद हुदली, एस. एम. खाडिलकर उपस्थित होते.
100821\10kol_2_10082021_5.jpg
फोटो (१००८२०२१-कोल-मनोज फराकटे केआयटी) : कोल्हापुरात मंगळवारी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांच्या स्वागत केआयटीचे अध्यक्ष सुनिल फराकटे यांनी केले. यावेळी शेजारी सचिन मेनन, दिपक चौगुले, रोशनी दुधाणे, साजिद हुदली, एस. एम. खाडिलकर उपस्थित होते.