कलेप्रती असणारी भावनाच कलाकाराला मोठे बनविते --डॉ. प्रवीणकुमार चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:37 AM2019-11-18T11:37:50+5:302019-11-18T11:39:28+5:30

कोल्हापूरचे चित्रकार विजय टिपुगडे म्हणाले, ‘कर्नाटक शासनाकडून नवे चित्रकार घडविण्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना राबविल्या जातात, ही बाब कौतुकास्पद असून, त्याचे अनुकरण होणे गरजेचे आहे.

It is the feeling of art that makes the artist bigger | कलेप्रती असणारी भावनाच कलाकाराला मोठे बनविते --डॉ. प्रवीणकुमार चौगुले

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे रविवारी विजापूर येथील चित्रकार राजश्री अलकुंटे यांचे चित्रप्रदर्शन पाहताना डॉ. प्रवीणकुमार चौगुले. शेजारी राजश्री अलकुंटे, विजय टिपुगडे आदी.

Next
ठळक मुद्देचित्रकार राजश्री अलकुंटे यांचे चित्रप्रदर्शन

कोल्हापूर : कलेप्रती असणारी समर्पक भावनाच कलाकाराला मोठे बनवीत असते, राजर्षी शाहू महाराजांनी कलेला दिलेला राजाश्रय हेच सर्वांत मोठे उदाहरण आपल्यासमोर असून, नवोदित कलाकारांनी यामधून प्रेरणा घ्यावी. कागल येथील डी. आर. माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीणकुमार चौगुले यांनी केले.

शाहू स्मारक भवन येथे विजापूर येथील चित्रकार राजश्री अलकुंटे यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कर्नाटक सरकारचा कला आणि संस्कृती विभाग प्रायोजक असणाऱ्या या चित्रप्रदर्शनामध्ये आकर्षक कलाकृती मांडण्यात आल्या आहेत.
कोल्हापूरचे चित्रकार विजय टिपुगडे म्हणाले, ‘कर्नाटक शासनाकडून नवे चित्रकार घडविण्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना राबविल्या जातात, ही बाब कौतुकास्पद असून, त्याचे अनुकरण होणे गरजेचे आहे.

सामाजिक कार्यकर्ते एम. डी. देसाई, चित्रकार राजश्री अलकुंटे यांनी मनोगत व्यक्त केले. हे प्रदर्शन मंगळवार (दि. १९)पर्यंत सकाळी १० ते ५.३० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार शिवाजी यादव, निवृत्त अधिकारी विनोद पंडित, वाचनकट्टा संकल्पक युवराज कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश कांबळे यांनी केले.

 

 

Web Title: It is the feeling of art that makes the artist bigger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.