अलमट्टीवर खापर फोडून पंचगंगेचा पूर रोखणे अशक्य, विज्ञान प्रबोधिनीचा निष्कर्ष; पुराची नेमकी कारणे जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 01:37 PM2023-07-25T13:37:56+5:302023-07-25T13:40:48+5:30

पुराबाबत अभ्यास आणि उपायांकडे दुर्लक्ष

It is impossible to stop the Panchgange flood by breaking the Khapar on Almatti, Conclusion of Vigyan Prabodhini | अलमट्टीवर खापर फोडून पंचगंगेचा पूर रोखणे अशक्य, विज्ञान प्रबोधिनीचा निष्कर्ष; पुराची नेमकी कारणे जाणून घ्या

अलमट्टीवर खापर फोडून पंचगंगेचा पूर रोखणे अशक्य, विज्ञान प्रबोधिनीचा निष्कर्ष; पुराची नेमकी कारणे जाणून घ्या

googlenewsNext

कोल्हापूर : वेळोवेळी केलेला अभ्यास आणि सुचविलेल्या उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पंचगंगा नदीला पूर येत असल्याचा निष्कर्ष कोल्हापूरच्या विज्ञान प्रबोधिनी या संस्थेने काढला आहे. या मर्यादित पुराचा स्वतंत्र अभ्यास लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड आणि निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी सोमवारी मेलद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली. केवळ अलमट्टीवर खापर फोडून पंचगंगेचा पूर रोखणे अशक्य असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे.

विज्ञान प्रबोधिनीने गेली तीन वर्षे शासनाकडे पाठपुरावा करूनही यासंदर्भात एकही उपाययोजना झालेली नाही, धरणे रिकामी ठेवा, अलमट्टीमुळेच पूर येतो, अधिकारी अभियंते ऐकत नाहीत असे मुद्दे मांडत यावर्षी पूर येणारच नाही असे ठामपणे मांडणारे जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजय दिवाण आणि प्रभाकर केंगार यांनी केलेला दावा फोल ठरला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

पंचगंगा नदीच्या पूर आलेल्या पाणलोटात अतिवृष्टी झालेली नाही. पंचगंगेच्या खोऱ्यात आजवर केवळ २३४१ मिलिमीटर पाऊस झाला. अलमट्टी धरणात ६२ टीएमसी पाणीसाठा असून, ११,४४४५ क्युसेक इतकी पाण्याची आवक आहे. धरण भरायला आणि बॅकवॉटरचा परिणाम होण्यासाठी अवधी आहे. २००५ आणि २०१९, २०२१ चे पूर अधिक काळ राहण्यास आणि वाढ होण्यास अलमट्टी हे कारण ठरले होते. परंतु, केवळ अलमट्टीकडे पूर्ण दोष दाखवून इथला पूर रोखता येत नाही, असे मुद्दे प्रबोधिनीने या पत्रात मांडले आहेत.

पंचगंगेच्या खोऱ्यात सद्या धरणांमधून २८०० क्युसेक इतकेच पाणी विसर्ग सुरू आहे. कृष्णेत पाण्याची नैसर्गिक भिंत तयार झाल्याने पंचगंगेचे पाणी पुढे न सरकण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या वारणा, दूधगंगा, कृष्णा, कोयनेचे पाणीही अद्याप परिणाम करीत नाहीत. कोल्हापुरात साेमवारी पहाटे तीन वाजता पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे; मात्र राजाराम बंधाऱ्यानंतर सुर्वे आणि रुई बंधारे वगळता इचलकरंजी इशारा पातळीला पोहोचलेली नाही. शिवाजी पूल, शिरोली पूल आणि इचलकरंजीतील पाणीपातळी उतरलेली दिसते. याचा अर्थ पंचगंगेच्या खोऱ्यात पडलेल्या पावसाचा हा पूर आहे, असे प्रबोधिनीने म्हटले आहे. हा पूर आता का आला?, इशारा पातळी का गाठली? हे शोधणे गरजेचे आहे, दिशाभूल करून पुराची खरी कारणे न अभ्यासणे किंवा लपविणे हे धोक्याचे आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

पुराची कारणे अशी

नद्यांची नैसर्गिक वळणे, नदी आणि धरण क्षेत्रात वाढलेले गाळाचे प्रमाण, नदीपात्रातील बंधारे आणि अतिक्रमणे, बेकायदा पूल व त्याचे भराव, पूरबाधित क्षेत्रातील बांधकामे, रस्त्यांचे भराव, खरमाती, कचऱ्याचे ढीग, उसाचे पीक, दरवाजा नादुरुस्त असल्याने, राधानगरी धरणातून वीजघराखेरीज पाण्याचा विसर्ग करता न येणे, खुल्या क्षेत्रातील पाऊस मोजता न येणे, १२ पुलांच्या कमी मोऱ्यांतून पाणी पुढे जाण्यासाठी लागणारा विलंब.

Web Title: It is impossible to stop the Panchgange flood by breaking the Khapar on Almatti, Conclusion of Vigyan Prabodhini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.