हुल्लडबाजी रोखणे सर्वांचीच जबाबदारी

By admin | Published: November 16, 2015 12:26 AM2015-11-16T00:26:52+5:302015-11-16T00:29:00+5:30

छत्रपती शाहू महाराज : नूतन नगरसेवक खेळाडूंचा सत्कार

It is the responsibility of everyone to stop rioting | हुल्लडबाजी रोखणे सर्वांचीच जबाबदारी

हुल्लडबाजी रोखणे सर्वांचीच जबाबदारी

Next

कोल्हापूर : यंदा फुटबॉल हंगाम सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी खेळाडू, संघ व्यवस्थापन आणि फुटबॉल रसिकांची आहे. हुल्लडबाजांना अटकाव करण्याची जबाबदारी ही सर्वच फुटबॉल क्लब, व्यवस्थापन यांची आहे. या सर्वांनी शिस्तबद्धरितीने जर प्रत्येक सामन्यात सहकार्य केल्यास यंदाचा हंगाम विनाअडथळा पार पडेल, असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने दिवाळी फराळ व नूतन नगरसेवक खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, कोल्हापूरची शतकी फुटबॉल परंपरा अबाधित राहावी यासाठी मैदानात होणारी हुल्लडबाजी रोखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. खेळाडूंसह पंच, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि समर्थकांनी खिलाडीवृत्तीने वाटचाल करणे आवश्यक आहे.
यंदाचा हंगाम सुरू करण्याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख व के.एस.ए.ची संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल असे माणिक मंडलिक यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक संभाजी जाधव, सचिन पाटील, विजय खाडे-पाटील, संतोष गायकवाड, नियाज खान यांचा फुटबॉल खेळाडू म्हणून, तर मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या स्नुषा व फुटबॉलपटू आश्किन आजरेकर यांच्या पत्नी निलोफर व जयश्री जाधव यांचा गौरव शाहू महाराज यांच्या हस्ते फुटबॉल, व्हिसल, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी कॅस्को कंपनीच्या फुटबॉलचे अनावरण श्रीमंत युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी दि. के. अतितकर, अरुण नरके, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, विश्वास कांबळे-मालेकर, सरदार मोमीन, आदी उपस्थित होते.

Web Title: It is the responsibility of everyone to stop rioting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.