शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे काळाची गरज : प्राचार्य तुपारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:17 AM2021-06-28T04:17:46+5:302021-06-28T04:17:46+5:30
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालयात आयोजित 'तंत्रस्नेही मी होणार' या कार्यशाळेत ते बोलत होते. सुभाष बेळगावकर यांनी ...
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालयात आयोजित 'तंत्रस्नेही मी होणार' या कार्यशाळेत ते बोलत होते. सुभाष बेळगावकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यशाळेत राज्यस्तरीय तंत्रस्नेही मार्गदर्शक प्रशांत मगदूम यांनी शिक्षकांना तंत्रस्नेही होण्यासाठी लागणा-या साधनांची प्रात्यक्षिकासह माहिती सांगितली.
अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे अध्ययन मनोरंजक कसे करता येईल? याची माहिती दीक्षा अॅप, युट्यूब ई-बालभारती, डिजिटल साक्षर या अॅपद्वारे दाखविण्यात आली.
मगदूम यांना राज्यस्तरीय तंत्रस्नेही पुरस्कार मिळाल्याबदल शाळेतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार झाला.
यावेळी माध्यमिक व ज्युनि. कॉलेजचे सर्व शिक्षक उपस्थित होते. ई. एल. पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळी : कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सरस्वती विद्यालयात 'तंत्रस्नेही मी होणार' या कार्यशाळेत तंत्रस्नेही प्रशांत मगदूम यांचा सत्कार करताना प्राचार्य तुपारे. बाजूला सुभाष बेळगावकर, ई. एल. पाटील आदी उपस्थित होते.
क्रमांक : २७०६२०२१-गड-०२