कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी असं वक्तव्य का केले? विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणार परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 11:32 AM2020-04-28T11:32:46+5:302020-04-28T11:37:39+5:30

शिवाजी विद्यापीठ ऐवजी राज्य शासनाच्या मालकीची जागा व जिल्हा सत्र न्यायालयाची जुनी इमारत येथे कोरोना रुग्णालय व नवीन अतिदक्षता विभाग सुरू करावे, अशी मागणी संजय पवार व विजय देवणे यांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली.

It will affect the mindset of the students | कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी असं वक्तव्य का केले? विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणार परिणाम

 ‘कोरोना’चे रुग्णालय शिवाजी विद्यापीठात करू नये, या मागणीचे निवेदन सोमवारी शिवसेनेच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे‘कोरोना’चे रुग्णालय विद्यापीठाऐवजी इतर ठिकाणी कराशिवसेनेची राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे मागणी : जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीचा पर्याय

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी वसतिगृहात ‘कोरोना’ रुग्णालय उभारले जाणार आहे. ‘कोरोना’चे रुग्णालय व अतिदक्षता विभाग तातडीने सुरू व्हावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे; मात्र यासाठी शिवाजी विद्यापीठच का? त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणार असून, त्याऐवजी जिल्हा सत्र न्यायालयाची जुनी इमारत मोकळीच आहे. तिथे रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सोमवारी केली.

संपूर्ण देशात ‘कोरोना’चा संसर्ग वाढत आहे. राज्यातून ‘कोरोना’ हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे मंत्रिमंडळ, डॉक्टर, परिचारिका, पोलिसांसह सर्वजण रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. या संकटाला तोंड देण्यासाठी कोल्हापुरात कोरोना रुग्णालय व अतिदक्षता विभाग तातडीने सुरू व्हावा, ही आमचीही इच्छा आहे. मात्र, ते शिवाजी विद्यापीठातच का? विद्यापीठात हे हॉस्पिटल उभारले तर विद्यार्थ्यांवर व त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा जिल्हा प्रशासनाने विचार केला का? याचा गांभीर्याने विचार करावा. शिवाजी विद्यापीठ ऐवजी राज्य शासनाच्या मालकीची जागा व जिल्हा सत्र न्यायालयाची जुनी इमारत येथे कोरोना रुग्णालय व नवीन अतिदक्षता विभाग सुरू करावे, अशी मागणी संजय पवार व विजय देवणे यांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली.

 

 

 

 

Web Title: It will affect the mindset of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.