पाऊण कोटीचा गुटखा नष्ट करणार
By admin | Published: September 22, 2014 11:04 PM2014-09-22T23:04:44+5:302014-09-23T00:13:06+5:30
उद्या कार्यवाही : अन्न, औषध प्रशासनाची मोहीम
सांगली : महाराष्ट्रात २० जुलै २०१३ पासून गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, तंबाखू यावर बंदी आणली. सांगलीच्या अन्न व औषध प्रशासनाने या आदेशानुसार गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले होते. येत्या २४ सप्टेंबर रोजी कुपवाडमध्ये हा अंदाजे ७५ लाखांचा माल जाळून नष्ट केला जाणार आहे, अशी माहिती विभागाचे सांगलीतील सहाय्यक आयुक्त (अन्न) द. ह. कोळी यांनी दिली.
सांगली कार्यालयाने गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी छापे टाकून प्रतिबंधित पदार्थ जप्त केले. यामध्ये गुटखा व पानमसाला मोठ्या प्रमाणावर सापडला. जवळपास ७५ लाखांचा जप्त केलेला माल येथील कार्यालयात आहे. तो आता जाळून नष्ट केला जाणार आहे. कुपवाड येथील एका आॅईल मिलमध्ये तो जाळण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)