जे. जे. मगदूम यांचे कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:56+5:302021-01-02T04:19:56+5:30
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये धन्वंतरी, शिक्षणमहर्षी स्व. डॉ. जे. जे. मगदूम यांची ९१ ...
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये धन्वंतरी, शिक्षणमहर्षी स्व. डॉ. जे. जे. मगदूम यांची ९१ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम व उपाध्यक्षा अॅड. सोनाली मगदूम यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
अध्यक्ष डॉ. मगदूम म्हणाले, स्व. मगदूम यांनी जयसिंगपूर शहरासह पंचक्रोशीतील सर्वसामान्य रुग्णांना कित्येक वर्षे आरोग्य सेवा देणेचे आदर्शवत कार्य केले. त्यांनी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचा वटवृक्ष उभा करून गेली ४३ वर्षे इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी व नर्सिंग कॉलेज तसेच शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करून ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्र. प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील, प्रा. पी. पी. पाटील, ए. बी. घोलप, एल. व्ही. कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्षा अॅड मगदूम यांचे मनोगत झाले. स्वागत डॉ. एस. बी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन ए. बी. यादव, विनायक चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन डी. आर. माने यांनी केले.
फोटो - ३११२२०२०-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे स्व. डॉ. जे. जे. मगदूम यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. विजय मगदूम, अॅड. सोनाली मगदूम, डॉ. एस. बी. पाटील, पी. पी. पाटील यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.