जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:31 AM2020-12-30T04:31:59+5:302020-12-30T04:31:59+5:30

डॉ. राजेंद्र हेद्दूर म्हणाले, इन्फोसिस या कंपनीने विद्यार्थ्यांच्या बुद्धिकौशल्यावर आधारित अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट, टेक्निकल इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यू याव्दारे निवड केली. ...

J. J. Selection of five students of Magdoom Engineering | जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांची निवड

जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांची निवड

Next

डॉ. राजेंद्र हेद्दूर म्हणाले, इन्फोसिस या कंपनीने विद्यार्थ्यांच्या बुद्धिकौशल्यावर आधारित अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट, टेक्निकल इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यू याव्दारे निवड केली. कंपनीत प्रणव हारोले, विशाल उमराणी, श्रीराज नायर, विनय निर्मले व सूरज बिरादार या विद्यार्थ्यांची निवड झाली.

या कॅम्पस ड्राईव्हमधील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल बोलताना डॉ. हेद्दूर यांनी सांगितले की, या सर्व विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या गरजांनुसार लागणारे सॉफ्ट स्कील्स, टेक्निकल स्कील्स, टेक्निकल ट्रेनिंग, ॲप्टिट्यड टेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्ह्यू, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आदींचे प्रशिक्षण दिले होते तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत पुढील नियोजित प्लेसमेंटच्या दृष्टीने सर्व विभागांच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ट्रेनिंग पुण्याचा नामांकित फर्ममार्फत उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण करण्यात आले या उपक्रमास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळेच यासारख्या कंपनीमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी निवडले जातात.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रा. रोहित बारवाडे, प्रा. नियाज नदाफ यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

फोटो - २९१२२०२०-जेएवाय-०१-यशस्वी विद्यार्थी

Web Title: J. J. Selection of five students of Magdoom Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.