जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या तीन विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:25+5:302021-08-12T04:28:25+5:30
असेंचर ही कंपनी माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करणारी असून देश व परदेशात अद्ययावत क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे सेवा देण्यामध्ये ...
असेंचर ही कंपनी माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करणारी असून देश व परदेशात अद्ययावत क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे सेवा देण्यामध्ये अग्रेसर असणारी आहे. कंपनीची ऑफिसेस पुणे, मुंबई, बेंगलोर येथे व इतर देशात कार्यरत आहेत. या कंपनीमध्ये स्नेहल शिंदे, अंजम सुतार व संकेत दिवेकर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. टी. एच. मोहिते, प्रा. आर. ए. सनदी, प्रा. व्ही. टी. कांबळे, प्रा. खाडे, प्रा. आर. सी. पाटील व प्रा. पी. पी. माळगे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो - १००८२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा अध्यक्ष डॉ. विजय मगदूम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.