जे. जे. मगदूम ट्रस्टची सामाजिक बांधीलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:59+5:302021-05-29T04:18:59+5:30

जयसिंगपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा आरोग्य विभाग पूर्ण ताकदीने या संकटाला सामोरे जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांना दिलासा ...

J. J. The social commitment of the Magdoom Trust | जे. जे. मगदूम ट्रस्टची सामाजिक बांधीलकी

जे. जे. मगदूम ट्रस्टची सामाजिक बांधीलकी

Next

जयसिंगपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा आरोग्य विभाग पूर्ण ताकदीने या संकटाला सामोरे जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांना दिलासा देण्यासाठी सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या जे. जे. मगदूम ट्रस्टने मोदी हॉस्पिटलमधील कोविड उपचार केंद्रामधून रुग्णांना चांगली सेवा द्यावी, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

येथील डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल यांच्यावतीने मोदी हॉस्पिटलमध्ये ४० बेडच्या कोविड उपचार केंद्राचे उद्घाटन राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांच्या हस्ते व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजयराज मगदूम यांनी स्वागत करुन उपचार केंद्रामधील सुविधेची माहिती दिली.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, डॉ. अशोकराव माने, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, नगरसेविका अ‍ॅड. सोनाली मगदूम, सावकर मादनाईक, अमरसिंह पाटील, राजू झेले, दादा पाटील-चिंचवाडकर, अर्जुन देशमुख, राजेंद्र दाईंगडे, युनूस डांगे, डॉ. जयश्री आवळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फोटो - २८०५२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे मोदी हॉस्पिटलमध्ये कोविड उपचार केंद्राचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. विजयराज मगदूम, अ‍ॅड. सोनाली मगदूम, राजू शेट्टी, सुरेश हाळवणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: J. J. The social commitment of the Magdoom Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.