जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:23 AM2021-03-19T04:23:32+5:302021-03-19T04:23:32+5:30
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून महाविद्यालयाच्या ...
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून महाविद्यालयाच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला. इन्फॉर्मेशन टेकनोलॉजी विभागातून प्रथम तीन क्रमांकासह सात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम, उपाध्यक्षा अॅड. सोनाली मगदूम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यामध्ये प्रियांका लक्ष्मण पवार, नयना जालिंदर पाटील, शीतल शिवाजी शिंदे, सुशांत सुनील डावरे, कृतिका कृष्णराज कुलकर्णी, संध्याराणी गौतम सोनकांबळे व सुजित प्रकाश सूर्यवंशी, आकाश अशोक पाटील, शालन पांडुरंग पाटील यांनी यश मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रभारी प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील, रजिस्टार ए. बी. घोलप, प्रा. आर. ए. सनदी, प्रा. एस. एम. शेख, व प्रा. टी. एच. मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो - १८०३२०२१-जेएवाय-०७-यशस्वी विद्यार्थी