मजरेवाडी येथील जॅकवेल पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:05+5:302021-07-26T04:24:05+5:30
इचलकरंजी : शहराला कृष्णा योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या शिरढोण (ता. शिरोळ) येथील मजरेवाडी जॅकवेलवर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे ...
इचलकरंजी : शहराला कृष्णा योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या शिरढोण (ता. शिरोळ) येथील मजरेवाडी जॅकवेलवर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे अनिश्चित कालावधीसाठी शहरातील पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याची माहिती जलअभियंता सुभाष देशपांडे यांनी दिली.
सततच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील नदीकाठचा परिसर जलमय बनला आहे. मजरेवाडी जॅकवेलमधून दाबनलिकेद्वारे अशुद्ध पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. त्यानंतर ते शुद्ध करून शहराला पुरवठा केला जातो. मात्र, पंचगंगा नदीला महापूर आल्याने जॅकवेल पाण्याखाली गेल्याने पंपिंग मशिनरी बंद केल्या आहेत. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात येत आहे. पुराचे पाणी ओसरताच पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.