जाधव इंडस्ट्रीजची आगेकूच कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल ; आर. आर. चॅलेंजर्स - महाराष्ट्र क्वीन लढत बरोबरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:33 AM2018-05-24T00:33:40+5:302018-05-24T00:33:40+5:30
कोल्हापूर : लाको भूतियाच्या उत्कृष्ट खेळी व निशाच्या एकमेवगोलच्या जोरावर जाधव इंडस्ट्रीजने मल्टी वॉरियर्सचा निसटता पराभव करीत कोल्हापूर वुमेन्स लीगफुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली; तर
कोल्हापूर : लाको भूतियाच्या उत्कृष्ट खेळी व निशाच्या एकमेवगोलच्या जोरावर जाधव इंडस्ट्रीजने मल्टी वॉरियर्सचा निसटता पराभव करीत कोल्हापूर वुमेन्स लीगफुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली; तर आर. आर. चॅलेंजर्स विरुद्धमहाराष्ट्र क्वीन यांच्यातीलतुल्यबळ लढत बरोबरीतसुटली.
शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आर. आर. चॅलेंजर्स विरुद्ध महाराष्ट्र क्वीन यांच्यातील तुल्यबळ लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. सामन्यात आर. आर. चॅलेंजर्सकडून प्रतीक्षा मिठारी, अनुष्का खतकर, सोनाली साळवी, पूजा करमरकर; तर महाराष्ट्र क्वीनकडून मिशेल कॅस्टन, सोनिया राणा, सुचिता पाटील, प्रणाली चव्हाण यांनी अनेक खोलवर चढाया केल्या.
मात्र, दोन्ही बाजूंच्या बचावफळ्या भक्कम असल्याने संपूर्ण वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. परिणामी संपूर्ण वेळेत सामना गोलशून्य असा बरोबरीत राहिला. सामन्यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनुष्का खतकर (आर. आर. चॅलेंजर्स), मिशेल कॅस्टन (महाराष्ट्र क्वीन) या दोघींचा गौरव करण्यात आला.
दुसरा सामन्यात जाधव इंडस्ट्रीजने मल्टी वॉरियर्सचा १-० असा निसटता पराभव केला. यात ‘मल्टी’कडून पृथ्वी गायकवाड, सरस्वती माळी, रम्या शांतिप्रसाद, तेजस्विनी कोळसे, पूजा धमाल यांनी गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या; तर जाधव इंडस्ट्रीजकडून निशा, जुलेखा बिजली, लाको
भूतिया, रिया बोलके, भक्ती पोवार यांच्यात समन्वय नसल्याने या खेळाडूंच्या अनेक गोल
करण्याच्या संधी वाया गेल्या. पूर्वार्धातही अनेक संधी निशा हिला मिळाल्या. मात्र, तिला आलेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी एकमेकांवर आघाडी घेण्यासाठी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. यात जाधव इंडस्ट्रीजकडून निशा हिने, तर मल्टी वॉरियर्सकडून रम्या शांतिप्रसाद हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ५३ व्या मिनिटाला मिळालेल्या संधीवर निशाने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. याच आघाडीवर जाधव इंडस्ट्रीजने विजय मिळविला. या सामन्यात लाको भूतिया (जाधव इंडस्ट्रीज) हिचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला.
गुणसंख्या अशी,
आर. आर. चॅलेंजर्स- ५, महाराष्ट्र क्वीन व जाधव इंडस्ट्रीज प्रत्येकी ४, छत्रपती शिवकन्या- २, तर मल्टी वॉरियर्स- ० गुण.
कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी आर. आर. चॅलेंजर्स विरुद्ध महाराष्ट्र क्वीन यांच्यातील तुल्यबळ लढतीमधील एक संघर्षपूर्ण क्षण.