कारागृह पोलिसाकडे तब्बल सव्वा दोन किलो गांजा सापडला; जुना राजवाडा पोलिसांची कारवाई 

By सचिन भोसले | Published: July 28, 2023 06:57 PM2023-07-28T18:57:44+5:302023-07-28T18:57:58+5:30

संशयित गेंड हे गेल्या दहा महिन्यापासून कळंबा मध्यवर्ती कारागृहात सुभेदार पदावर रुजू झाले होते.

Jail police found nearly two and a half kilos of ganja Old Palace police action | कारागृह पोलिसाकडे तब्बल सव्वा दोन किलो गांजा सापडला; जुना राजवाडा पोलिसांची कारवाई 

कारागृह पोलिसाकडे तब्बल सव्वा दोन किलो गांजा सापडला; जुना राजवाडा पोलिसांची कारवाई 

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुभेदार पदावर काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याकडे नियमित तपासणीत १७१ ग्राम च्या दोन पुड्या तुरुंग प्रशासनाला आढळल्या. याबाबत प्रशासनाने जुना राजवाडा पोलिसां त फिर्याद दाखल केली. या गुन्ह्यानंतर पोलिसांनी संस्थेच्या घराची झडती घेतली असता तब्बल २ किलो ३२५ ग्रॅम व ५० हजार रोकड असा सुमारे ७३ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे रक्षकच अंमली पदार्थाच्या पुरवठदार असल्याचे पुढे आले. बाळासाहेब भाऊ गेंड (वय ५०, रा. आंबेडकर गल्ली, कळंबा) असे अटक केलेल्या संशयताची नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी (दि.२७) सकाळी कारागृहात नियमित कर्तव्यावर हजार होत असताना संशयित गेंड यांची तपासणी सुरक्षारक्षकांनी केली असता त्यांच्याजवळ १७१ ग्रॅमच्या दोन पुड्या आढळून आल्या. याबाबत कारागृह शिपाई महेश दिलीप देवकाते यांनी तरुण प्रशासनाच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तात्काळ पावले उचलत संशयित गेंड या स अटक केली. अटके नंतर न्यायालयात हजर केले असता संशयितास चार दिवसांची ३१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये संशयिताने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. कळंबा येथील त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता घरात  तब्बल २ किलो ३२५ ग्रॅम व ५० हजार रोकड असा सुमारे ७३ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. 

संशयित गेंड हे गेल्या दहा महिन्यापासून कळंबा मध्यवर्ती कारागृहात सुभेदार पदावर रुजू झाले होते. या संशयितवर पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्य, मनो व्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम (आ) २०३२, कारागृह अधिनियम१८९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार-पाच महिन्यात याच कारागृहात मोबाईलचा बॅटऱ्या आणि गांजा सापडला होता. त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीतम कुमार पुजारी करीत आहे.
 

Web Title: Jail police found nearly two and a half kilos of ganja Old Palace police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.