हेरले येथे आजपासून जैन तत्त्वज्ञान ई-संस्कार शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:01+5:302021-06-06T04:18:01+5:30
हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथे समयासार कहान शताब्दी महोत्सव वर्षाअंतर्गत भारतात धर्म प्रभावणेचा हेतूने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ...
हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथे समयासार कहान शताब्दी महोत्सव वर्षाअंतर्गत भारतात धर्म प्रभावणेचा हेतूने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जैन तत्त्वज्ञान ई-संस्कार शिबिराचे ६ जून ते १२ जूनअखेर परमागम प्रभावणा ट्रस्ट पुणे व सर्वोदय स्वाध्याय ट्रस्ट हेरले यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले आहे.
१२ जून २०२१ पर्यंत असणाऱ्या या तत्त्वज्ञान शिबिराचा शुभारंभ रविवार दिनांक ६ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजता अनंतभाई शेट मुंबई, ब्रजलालजी हथाया (सभा अध्यक्ष), विनूभाई शाह (स्वागताध्यक्ष), विनोदजी निरखे (मलकापूर), सुमी जैन सुपुत्री सुनील सराफ (शिबिर उदघाटनकर्ता) पारस जी. पारेख (आमंत्रणकर्ता) गाथा एच. जी. कलश राठी (मंगलाचरण) संजीवकुमार गोधा, जयपूर (मंगल उद्घोधन), पं. अनिल आलमान व पं. प्रसन्नशेठ आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत केला जाईल.