‘जैन सूर्योदय साहित्य रत्न’ पुरस्कार विश्र्वनाथ शिंदे यांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:22 AM2021-02-10T04:22:59+5:302021-02-10T04:22:59+5:30

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख व साहित्यिक प्रा. डाॅ. विश्र्वनाथ शिंदे यांना नाशिकच्या सूर्योदय ...

‘Jain Suryodaya Sahitya Ratna’ award announced to Vishwanath Shinde | ‘जैन सूर्योदय साहित्य रत्न’ पुरस्कार विश्र्वनाथ शिंदे यांना जाहीर

‘जैन सूर्योदय साहित्य रत्न’ पुरस्कार विश्र्वनाथ शिंदे यांना जाहीर

Next

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख व साहित्यिक प्रा. डाॅ. विश्र्वनाथ शिंदे यांना नाशिकच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्यावतीने देण्यात येणारा ‘भवरलाल जैन सूर्योदय साहित्य रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. एकवीस हजारांचा धनादेश, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी गिरिजा कीर, प्रा. डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. डाॅ. सदानंद मोरे, प्रा. डाॅ. किशोर सानप यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मंडळाच्या एकोणीसाव्या वर्धापनदिनानिमित्त दलूभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित हा पाचवा पुरस्कार आहे. पुरस्कार वितरण जळगावला दि. ८ व ९ जानेवारी २०२२ रोजी सुप्रसिद्ध लेखक प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दोनदिवसीय पहिल्या अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात होईल. मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी ही माहिती दिली.

फोटो : ०९०२२०२१-कोल-विश्वनाथ शिंदे-पुरस्कार

Web Title: ‘Jain Suryodaya Sahitya Ratna’ award announced to Vishwanath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.