जैन्याळच्या यशवंतची इस्त्रोत भरारी

By admin | Published: April 24, 2016 11:47 PM2016-04-24T23:47:42+5:302016-04-25T00:58:41+5:30

भव्य मिरवणुक : ग्रामस्थांकडून यशवंत बांबरे यांचे जल्लोषात स्वागत

Jainyal's Yashwant's ISROTS fiasco | जैन्याळच्या यशवंतची इस्त्रोत भरारी

जैन्याळच्या यशवंतची इस्त्रोत भरारी

Next

सेनापती कापशी : शालेय शिक्षणाचे धडे घेत असतानाच डोक्यावरील आईचे छत्र नियतीने काढून घेतले. घरची जमिन वडील सखाराम बांबरे यांची नसल्याने उभी हयात मोलमजुरी करण्यात गेले. अशा कठीण परिस्थीतीत जैन्याळ (ता. कागल) येथील यशवंत सखाराम बांबरे याने प्रचंड अत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर इस्त्रो मध्ये वैज्ञानिक अभियंता या पदावर भरारी मारली आहे. यामुळे त्याच्या कुटूंबासह जैन्याळकरांच्या आनंदाला पारावर उरला नाही. जैन्याळ करांनी त्याचे जल्लोषात मिरवणुकीनी स्वागत केले. संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यस्तरावर चमकलेल्या जैन्याळचे नाव यशवंत च्या या घवघवीत यशाने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जन्मापासुन प्रत्येक गोष्टीसाठी यशवंताला संघर्ष करावा लागला. मुळातच घरची गरीब परिस्थीती त्यात त्याचा नम्र स्वभाव यामुळे ते शालेय जीवनापासुनच शिक्षकांचा आवडता होता. त्याच्या मामाने शिक्षणासाठी भक्कम पाठिंबा दिला. यामुळेच तो हे घवघवीत यश मिळवू शकला.
‘इस्त्रो’ मध्ये वैज्ञानिक अभियंता या पदावर निवड करण्यात आल्याचे पत्र त्याला प्राप्त झाले असून ते पत्र घेवून तो तिरुअनंतपूर येथील केंद्रामध्ये १३ मे रोजी शास्त्रज्ञ म्हणून रुजू होत आहे. जैन्याळ या दोन हजार लोकसंख्येच्या गावातील मिळविलेले यश हे निश्चितच प्रेरणादायी आहे. गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंतचे शिक्षण घेवून पुढील शिक्षणासाठी सेनापती कापशी येथील न्यायमुर्ती रानडे विद्यालयात प्रवेश रोज सहा-सात किलो मिटरची पायपीट दहाविपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. देवचंद कॉलेज अर्जुन नगर मध्ये उच्च शिक्षण करुन पुणे विद्यापिठातून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी चांगल्या गुणांनी मिळविला. भारतातून सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी इस्त्रो ची परिक्षा दिली होती. त्यतून ३०० जणांना प्रत्यक्ष मुलाखतीस बोलाविण्यात आले व फक्त ३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात यशवंतने २९ वा क्रमांक मिळविला.
दरम्यान ‘इस्त्रो’ मध्ये निवड झालल्या यशवंतचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करुन गावातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढली. संपुर्ण गावात साखर पेढे वाढून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी सरपंच संपदा कांबळे, माजी सरपंच परशराम शिंदे, माजी उपसरपंच ज्ञानदेव भोंगाळे, माजी सरपंच पी. के. पाटील, सखाराम बरकाळे, माजी उापसरपंच धनाजी शेळके, दिनकर पाटणकर सर आदींच्या उपस्थितीत यशवंतचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अशोक जाधव, मोहन पाटील, उत्तम साळवी, हिंदूराव डावरे, यांनी मनोगत व्यक्त केले. विविध संस्थांनी यशवंतच्या सत्कार केला.


यशवंत व्यासपिठावरच नतमस्तक
या सत्काराला उत्तर देताना यशवंत व्यासपिठावरच नतमस्तक झाला व माझ्या या यशात आई-वडिल, मामा यांच्या बरोबरच भाऊ, गावातिल दिनूमामा, नाना, दिगंबर शेळके यांचा मोठा वाटा आहे. घरच्या गरिबीमुळे गावातील दूधसंस्थेत काम करुन शिक्षण घेतले पण नशीबाला दोष न देता अविरत मेहनत घेतली अपयश अनेकदा आले पण अपयश ही संधी मानली व पून्हा जोमाने अभ्यास केला. देव कधीच सगळे दरवाजे बंद करत नाही. एखादे दार तो उघडे ठेवतो. यावरच माझा विश्वास असल्यामुळे आजपर्यंत सकारात्मक विचार करत आलो. विद्यार्थी दशेत मित्र हा सर्वात मोठा दूवा असतो. आपण कोणाची संगत केली यावरच आपले भवितव्य अवलंबून असते. सुदैवाने मला चांगले मित्र मिळाले. आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

जिद्द सोडली नाही : बांबरे
देवचंद कॉलेजच्या व्हरांड्यात काळ््या फरशीलाच पाठी मानली आणि त्या फरशिवरच बारवी सायन्सचा अभ्यास केला. ती फरशी पुसताना तळहाताचे चमडे गेले पण जिद्द सोडली नाही. हे संगताना यशवंतच्या डोळ्यात पाणी आले.

Web Title: Jainyal's Yashwant's ISROTS fiasco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.