Kolhapur Crime: पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वीकारली दहा हजाराची लाच, सहाय्यक फौजदार रंगेहाथ अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 06:49 PM2023-04-20T18:49:10+5:302023-04-20T18:53:06+5:30
विकलेली गाडी परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच
जयसिंगपूर : चारचाकी व्हॅन परत मिळवून देण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारताना जयसिंगपूर येथील सहाय्यक फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमनाथ देवराम चळचुक (वय ४८, रा. गल्ली नं. १६, विजयमाला नगर, जयसिंगपूर, मुळ रा.बाडगी, ता.पेट, जि.नाशिक) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना आज, गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्याच्या आवारात घडली.
तक्रारदार यांनी विकलेली गाडी परत मिळवून देण्यासाठी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. व्हॅन परत मिळवून देण्यासाठी सहाय्यक फौजदार चळचुक यांनी १५ हजार रुपयाची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम दहा हजार रुपये ठरली. गुरुवारी सकाळी लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचुन १० हजाराची रक्कम स्वीकारताना सहाय्यक फौजदार चळचुक याला रंगेहाथ पकडले.