जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:52 AM2020-12-11T04:52:11+5:302020-12-11T04:52:11+5:30
अब्दुललाट : येथील संजय आवळे यांना क्रांतिसूर्य फाउंडेशनच्यावतीने समाजरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त ...
अब्दुललाट : येथील संजय आवळे यांना क्रांतिसूर्य फाउंडेशनच्यावतीने समाजरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त माजी खासदार राजू शेट्टी, कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर व सिनेअभिनेते स्वप्निल राजशेखर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. आवळे हे पुणे येथील महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख विभागात संशोधक सहायक म्हणून कार्यरत आहेत.
फोटो - १०१२२०२०-जेएवाय-०१-संजय आवळे
------------------
खड्डे बुजविण्याची मागणी
जयसिंगपूर : येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील नांदणी नाक्याकडे जाणाऱ्या मार्गापासून क्रांती चौक या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गावरून मोठी वाहतूक होत असते. मात्र, रस्त्यात खड्डे पडल्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
------------------
रस्त्यावर धूळच धूळ
शिरोळ : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चौंडेश्वरी सूतगिरणीसमोर रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना तसेच नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत असल्याने सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात प्रदूषण करणाऱ्या घटकांवर प्रदूषण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
------------------
पोलीस ठाण्यात अनेक वाहने धूळ खात
जयसिंगपूर : विविध प्रकरणात वाहने जप्त केली जातात. त्यातील काही वाहने नंतर न्यायालय आदेशाने सोडविली जातात, तर काही वाहनांचे मालक समोरच येत नाहीत. अशा वाहनांचा थेट लिलाव करता येत नसल्याने कायदेशीर प्रक्रिया पार पाडून लिलाव केला जातो. मात्र, जयसिंगपूर पोलीस ठाण्यात मागील अनेक वर्षांपासून धूळ खात वाहने पडली आहेत.
-------------------