जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:39 AM2020-12-12T04:39:21+5:302020-12-12T04:39:21+5:30

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील भैरवनाथ सहकारी सेवा संस्थेच्यावतीने सभासद संजय चौगुले यांना ट्रॅक्टर प्रदान करण्यात आला. संस्थेचे ...

Jaisingpur Brief News | जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या

Next

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील भैरवनाथ सहकारी सेवा संस्थेच्यावतीने सभासद संजय चौगुले यांना ट्रॅक्टर प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष एन. डी. पाटील, जिल्हा बँकेचे निरीक्षक ए. बी. उदगांवे यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे पूजन झाले. यावेळी शाखाधिकारी बाळासो दानोळे, नजीर पिरजादे, रामगोंडा पाटील, आप्पासोा लठ्ठे, आप्पालाल शेख, सागर कऱ्याप्पा, संजय लडगे, बाळासोा पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते.

--------------------

शिरोळमध्ये रस्त्याचे काम सुरू

शिरोळ : येथील जुना कुरुंदवाड रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गाचे मुरमीकरण करण्याबरोबरच सांडपाणी निचरा होण्यासाठी पाईप टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कित्येक दिवसापासून याठिकाणी सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न होता. दरम्यान, या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

----------------------

निवडणुकीसाठी इच्छुकांची तयारी

शिरोळ : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. जानेवारीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता गृहीत धरून इच्छुकांनी आपापल्या प्रभागात भेटीगाठींवर भर दिला आहे. तर अनेकजण पक्ष व आघाडीकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

----------------------

शेतकरी आर्थिक अडचणीत

जयसिंगपूर : सध्या भाजीपाल्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कवडीमोल दराने भाजीपाला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादनखर्च, औषध फवारणी, मजुरांचा खर्चदेखील भाजीपाला विक्रीतून निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

----------------------

कचऱ्याबाबत मानसिकता बदलण्याची गरज

जयसिंगपूर : शहरात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. दररोज पालिकेकडून प्रभागनिहाय घंटागाड्यांचे नियोजन करून कचरा उचलला जातो. तरीदेखील काही त्रस्त नागरिकांकडून उघड्यावरच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. त्यामुळे नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.

------------------------

सुरेश पाटील यांची निवड

दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील सुरेश नरसगोंडा पाटील यांची आत्मनिर्भर भारत योजनेच्या जिल्हा समन्वयकपदी व प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार व प्रसार अभियानाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी नुकतेच दिले. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Jaisingpur Brief News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.