जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:28+5:302020-12-12T04:40:28+5:30

अब्दुललाट : माजी आमदार, श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष स्व. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या ...

Jaisingpur Brief News | जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या

Next

अब्दुललाट : माजी आमदार, श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष स्व. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी अप्पा पाटील, डॉ. दशरथ काळे, संजय परीट, विद्याधर कुलकर्णी, राजाराम काळगे, सुनील सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी आ. क. कुरुंदवाडे होते. दादासो पाटील यांनी स्वागत केले, तर मिलिंद कुरणे यांनी आभार मानले.

------------------

दानोळी-जयसिंगपूर मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक

दानोळी : दानोळी-जयसिंगपूर मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील साईडपट्टीवर झाडाझुडपांचे मोठे साम्राज्य वाढल्याने हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या मार्गावरून दानोळी, कवठेसार, हिंगणगाव, कुंभोज, नरंदे, वडगाव या गावांतील वाहनांमुळे रहदारी वाढलेली असते. या झाडाझुडपांमळे रस्ता अरुंद बनला असून अनेक ठिकाणी वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. तसेच सध्या ऊस वाहतुकीची वाहने सुरू असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्टीवरील झाडेझुडपे हटवावीत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

फोटो - १११२२०२०-जेएवाय-०२-दानोळी-जयसिंगपूर मार्गावर अशा प्रकारे झाडेझुडपे आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

Web Title: Jaisingpur Brief News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.